मराठी नाट्य कलाकार संघाकडून ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांना ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; वंदना गुप्ते यांचाही यंदा होणार सन्मान

Pradeep Velankar: मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप वेलणकर यांना जाहीर झाला.

Pradeep Velankar: मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप वेलणकर यांना जाहीर झाला.

Pradeep Velankar Rangkarmi Jivangaurav Award: मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप वेलणकर यांना जाहीर झाला आहे. व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या रंगकर्मींचा हक्काचा एक दिवस असावा, या उद्देशाने मराठी नाट्य कलाकार संघातर्फे नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून 25 नोव्हेंबर हा दिवस, 2014 या वर्षापासून ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ सन्माननीय रंगकर्मीला प्रदान केला जातो. यंदाचा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता माहीम-माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे.

IFFIमध्ये चित्रपटांसोबत खाद्यसंस्कृती, कला आणि मनोरंजनाचीही मेजवानी; सर्जनशील उपक्रमांनी महोत्सव परिसर गजबजला

गेल्यावर्षी महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर ओढवलेल्या पूर परिस्थितीच्या संकटामुळे हा सोहळा करण्यात आला नव्हता. त्यामुळे गेल्यावर्षी ज्येष्ठ रंगकर्मी वंदना गुप्ते यांना जाहीर झालेला ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदाच्या कार्यक्रमात त्यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी दिली. यावेळच्या कार्यक्रमात ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम सादर होणार असून, त्यात ओंकार प्रभुघाटे व नुपूर गाडगीळ यांचे गायन होणार आहे. प्रदीप वेलणकर व वंदना गुप्ते यांची मुलाखतही यावेळी घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. मराठी नाट्य कलाकार संघ ही अखिल भारतीय नाट्य परिषदेची व्यावसायिक रंगभूमीवरील रंगकर्मींसाठी कार्य करणारी अधिकृत घटक संस्था आहे. आतापर्यंत भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, किशोर प्रधान, शोभा प्रधान, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, उषा नाडकर्णी, रोहिणी हट्टंगडी, मोहन जोशी या कलाकारांना मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

follow us