Sonu Sood : व्हायरल व्हिडीओतून नशीब उजळलं, थेट सोनू सूदकडून मिळाली ऑफर!

मुंबई : सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताता. यातून अनेकांचं नशीब उजळत असंच एका व्हायरल व्हिडीओमध्ये गाणाऱ्या मुलासोबत घडलं आहे. बिहारमधील अमरजीत जयकर या मुलाचा गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ अभिनेता सोनू सूद पर्यंत पोहचला आणि सोनुने थेट या मुलाला त्याच्या आगामी चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली आहे. एक बिहारी , सौ पे […]

Sonu Sood

Sonu Sood

मुंबई : सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताता. यातून अनेकांचं नशीब उजळत असंच एका व्हायरल व्हिडीओमध्ये गाणाऱ्या मुलासोबत घडलं आहे. बिहारमधील अमरजीत जयकर या मुलाचा गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ अभिनेता सोनू सूद पर्यंत पोहचला आणि सोनुने थेट या मुलाला त्याच्या आगामी चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली आहे.

अभिनेता सोनू सूदने त्याच्या ट्विटर हॅंडलवर या मुलाचा व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. यामध्ये सोनू म्हणाला की, ‘एक बिहारी सौ पे भारी’. तर सोनुने या मुलाला त्याचा आगामी चित्रपट ‘फतह’ मध्ये गाणं गाण्याची संधी दिली आहे. हा मुलगा बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यातील पटोरी या गावचा राहिवासी आहे.

Gautami Patil च्या थिरकण्यावर प्रेक्षकांकडून नोटांचा पाऊस…

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये या मुलाने हातात टूथ ब्रश घेत ‘दिल दे दिया है जान तुम्हें देंगे’ हे गाणं गायलं आहे. तो नेहमीच सोशल मिडीयावर व्हिडीओ शेअर करत असतो. याअगोदर त्याने ‘सारेगामापा’ या रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन दिली होती.

Exit mobile version