Gautami Patil च्या थिरकण्यावर प्रेक्षकांकडून नोटांचा पाऊस…
अहमदनगर : गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तिथं गोंधळ हे एक समीकरणच बनलंय. मागील काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवरुन घमासान सुरु आहे. अशातच अहमदनगरमधील राहाता इथल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं समोर आलं आहे. गौतमी पाटील स्टेजवर आपलं नृत्य सादर करीत असताना काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशांची उधळण केली आहे.
राहता इथं सुरु असलेल्या गौतमी पाटीच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. प्रेक्षकांकडून उधळण सुरु असतानाच गौतमीला ही हुल्लडबाजी आवडली नाही. तिने तत्काळ आपलं नृत्य थांबवत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तिने स्वत: हातात माईक घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली.
काल फडणवीस, आज एकनाथ शिंदे यांचा कसब्यात पॉवर शो
गौतमीने आपलं नृत्य थांबवल्याने प्रेक्षकांनी गोंधळ घालत राडा घातला. यामध्ये अतिउत्साही प्रेक्षकांना कंट्रोल करताना 60 बाऊन्सरसह आयोजकांना चांगलीच पराकाष्टा सहन करावी लागली.
मोठी बातमी! राज्यात १५ मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार, महसूल मंत्री विखेंची माहिती
एवढंच नाहीतर यावेळी बघ्यांकडून राडा घालण्यात आल्याने धावपळ सुरु झाली. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. अचानक पळापळ सुरु झाल्याने काही काळ कार्यक्रमात तणावाचं वातावरण तयार झालं होतं.
विश्वभारती विद्यापीठात दाखवणार ‘India – The Modi Question’; राजनाथ सिंह हाकेच्या अंतरावर असतांना होणार प्रसारण
अखेर प्रेक्षकांच्या राड्यामुळे गौतमी पाटीलला पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात कार्यक्रम स्थळाच्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं. जेव्हा गोंधळ सुरु झाला तेव्हा पोलिस आणि बाऊन्सरांकडून प्रेक्षकांच्या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, प्रेक्षकांचा गोंधळ काही थांबेना. अखेर पोलिसांना यावेळी काठ्यांचा प्रसार द्यावा लागला. गौतमी पाटील कार्यक्रम स्थळावरुन जात असतानाही गौतमीच्या गाडीला प्रेक्षकांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर गौतमी कार्यक्रम स्थळावरुन बाहेर पडली आहे.
आसाम पोलिसांनी अटक केल्यानंतर Pawan Khera यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा !
दरम्यान, सारख्या वादाच्या भोवऱ्यात अडकणारी गौतमी पाटीलवर अनेकांकडून अश्लील नृत्याप्रकरणी आरोप केले जात आहेत. सातारा न्यायालयाकडून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
अलीकडेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तिच्या कार्यक्रमांवरुन कार्यकर्त्यांना तंबी दिली होती. त्यानंतर गौतमी पाटीलने अजित पवार यांची माफी मागत मी आता अश्लील नृत्य करीत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.