काल फडणवीस, आज एकनाथ शिंदे यांचा कसब्यात पॉवर शो

  • Written By: Published:
काल फडणवीस, आज एकनाथ शिंदे यांचा कसब्यात पॉवर शो

पुणे : पुण्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यात रोड शो, नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रचाराला शेवटचे काही तास शिल्लक असताना, उमेदवारांची रणधुमाळी सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते कसब्यात ठाण मांडून आहेत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचा हेमंत रासने यांच्या प्रचारर्थ कसब्यात रोड शो झाला. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे भाजपचे उमेदवार रासने यांच्यासाठी रोड शो ( Roadshow ) करणार आहेत, अशी माहिती पुणे शहर शिवसेनेने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर कुठलाही प्रचार करता येणार नाहीये. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने सर्वच पक्ष प्रचाराच्या मैदानात ताकदीने उतरले आहेत.

राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षात जनाधार नेमका कोणाच्या बाजूने आहे, याचे चित्र कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील निकालात उमटणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्हीही ठिकाणी विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आज पुण्यात रोड शो करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी कसबा तसेच चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक गांभीर्याने घेतली आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ दुपारी एक वाजता रोड शो करणार आहेत. या रोड शोची सुरूवात समता भूमी येथून होणार आहे. समता भूमी येथून रंभाजी बागवे कमान, डावीकडे जनाई मळा, सरळ पालखी विठोबा चौक, सरळ हमाल तालीम, सरळ खाकसार मस्ज्जीद डाव्याबाजूने हिंदमाता चौक, डाव्याबाजुने साखळीपीर तालीम,सरळ डोके तालीम, लक्ष्मी रोड अल्पना टोकिज, सरळ हमजेखान चौक, डाव्याबाजूने गोविंद हलवाई चौक, कस्तुरे चौक, सरळ मोमीनपुरा,सरळ विजय कदम चौक, उजवीकडे सिंहगड, गैरेज उजवीकडे सेंट हिल्डाज स्कूल,सरळ शितलादेवी चौक, डावीकडे फडगेट पोलीस चौक,सरळ सेवा मित्र मंडळ,अकरा मारुती मंडळ, सरळ उमरदंड चौक, डावीकडून संगम साडी सेंटर, सरळ चिमण्या गणपती, सरळ मरीआई माता, उजवीकडे नागनाथ पार शगुन चौक, सरळ जोगेश्वरी, सरळ बुधवार चौक,सरळ मोती चौक, डावीकडे फडके हौद चौक असा या रोड शो चा मार्ग आहे. लालमहाल येथे या रोड शोचा समारोप होणार आहे.

मनसेला खिंडार ! निवडणुकांच्या तोंडावर 50 मनसैनिकांनी दिले राजीनामे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube