मनसेला खिंडार ! निवडणुकांच्या तोंडावर 50 मनसैनिकांनी दिले राजीनामे

मनसेला खिंडार ! निवडणुकांच्या तोंडावर 50 मनसैनिकांनी दिले राजीनामे

पुणे : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यातच आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. मनसेने (MNS) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी मविआच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आलीये. मनसेच्या 7 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याने त्यापाठोपाठ 50 मनसैनिकांनी आपले राजीनामी दिले आहे. यामुळे पुण्यात मनसेला मोठे खिंडार पडले आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी या निवडणुकीला प्रतिष्ठेचे बनवले आहे. यातच मनसेने या निवडणुकीत आपला उमेदवार न देता भाजपाला पाठिंबा जाहीर केला.

भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. दरम्यान मनसेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याची माहिती समोर आली. यामुळे सात जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

टी -20 विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघ पराभूत

एकीकडे हे सगळं सुरु असताना मात्र दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या काळात मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांनी देखील आपले राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मनसैनिकांनी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Pune Bypoll Election : पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस>

या सात जणांची हकालपट्टी
रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम अशी या सात जणांची नावं असून त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास जणांनी राजीनामे दिले. या सर्वानी आपले राजीनामे पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठविले आहे.

Tags