टी -20 विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघ पराभूत

टी -20 विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघ पराभूत

नवी दिल्ली : टी -20 विश्वचषक जिंकण्याचे भारतीय महिला क्रिकेट संघाचे स्वप्न भंगले आहे. सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पाच धावांनी पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने सलग सातव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी, संघाने 2010, 2012, 2014, 2016, 2018, 2020 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. तर ऑस्ट्रेलिया संघ 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये चॅम्पियन बनला.

तत्पूर्वी टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स देत 172 धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघाची फिल्डिंग अत्यंत निराशाजनक राहिली. भारतीय खेळाडूंकडून मेग लॅनिंग आणि बेथ मुनी यांचा अगदी सहज घेता येणार कॅच सुटला. परिणामी, मूनी आणि लॅनिंगने मोठे डाव खेळला. मूनीने 37 चेंडूत 54 धावा केल्या. या व्यतिरिक्त, लॅनिंगने कर्णधारपदाचा डाव खेळताना 34 चेंडूंमध्ये नाबाद 49 धावा केल्या. शली गार्डनरने 18 चेंडूत 31 धावा केल्या.

दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने खराब सुरुवात केली. भारताने 3.4 षटकांत 28 धावा देत 3 महत्वाच्या विकेट दिल्या. शेफली वर्मा ()), स्मृति मंधना (2) आणि यस्तिका भाटिया (0) लवकरच तंबूत परतले. त्यानंतर, जेमिमा रॉड्रिग्ज आणि हर्मनप्रीत कौर यांनी 41 चेंडूंमध्ये 69 धावा केल्या व या सामन्यात भारताने पुनरागमन केले.

जेमिमाने 43 धावांवर बाद झाली तर हरमनप्रीत कौरने अर्धशतक लगावत 52 धावांवर बाद झाली. त्यानंतर कोणीही मोठा स्कोर करू शकले नाही. अशा पद्धतीने भारतीय संघ केवळ 20 षटकांत 8 विकेटसाठी 167 धावा करू शकला आणि केवळ 5 धावांनी भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.

Earthquake : तुर्की पाठोपाठ आता इंडोनेशियात भूकंपाचे धक्के, 6.3 रिश्टर स्केलची नोंद

एकीकडे भारताचा पराभव झाल्याने भारतीय संघ या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाला तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा आजवरचा रेकॉर्ड पाहता ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्डकप जिंकू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube