Pune Bypoll Election : पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस

Pune Bypoll Election : पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस

पुणे : कसबा (Kasba Bypoll Election) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll Election) विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा (Election Campaign) आजच (24 फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर कुठलाही प्रचार करता येणार नाहीये. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने सर्वच पक्ष प्रचाराच्या मैदानात ताकदीने उतरत आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.

आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबणार आहे. त्याआधी रोड शो करुन, सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेते करणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे भाजपाच्या उमेदवारासाठी रोड शो ( Roadshow ) करणार आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे दिग्गज नेतेही आज आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शो करणार आहे. ठिकठिकाणी सभांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

Earthquake : तुर्की पाठोपाठ आता इंडोनेशियात भूकंपाचे धक्के, 6.3 रिश्टर स्केलची नोंद

कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत या निवडणुकीत दिसून येत आहे. भाजपकडून या निवडणुका बिनविरोध करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती मात्र विरोधी पक्षांनी निवडणुका होणारच असे जाहीर केल्याने अखेर या निवडणुका होणार आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी या पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

टी -20 विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघ पराभूत

पुण्यात आज ‘या’ नेत्यांचे रोड शो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी दुपारी एक वाजता महात्मा फुले वाड्यापासून रोड शो करणार आहेत. तर कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सकाळी अकरा वाजता रोड शो करणार आहेत. चिंचवड मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अश्विन जगताप यांच्यासाठी बैठका आणि प्रचार रॅली करणार आहेत तर नाना काटे यांच्यासाठी अजित पवार चिंचवडमधे रोड शो करणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube