Download App

Prashant Damale : मराठी रंगभूमीसाठी भाग्याचा दिवस, प्रशांत दामलेंना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : मराठीतील विक्रमवीर अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले आणि नाट्य-चित्रपट दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी रंगभूमीसाठी हा भाग्याचा दिवस ठरला आहे.

हा सन्मान स्विकारताना प्रशांत दामले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले, ‘हा खुप मोठा सन्मान आहे. माझ्या सर्व सहकलाकारांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व बॅक स्टेज कलाकारांच्या वतीने आणि फक्त महाराष्ट्र, भारत नाही तर संपूर्ण जगातल्या मराठी नाट्य रसिकांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारत आहे.’

लग्नाबाबत प्राजक्ताचा प्रश्न अन् श्री श्री रविशंकर यांचं सुंदर उत्त

मराठीतील विक्रमवीर अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांनी हा पुरस्कार स्विकारल्यानंतर अनेक कलाकार आणि प्रेक्षकांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर ‘एका लग्नाची गोष्ट’ या गाजलेल्या नाटकातील प्रशांत दामले यांची सहकलाकार आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांनीहीराष्ट्रपतींच्या हस्ते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याचा व्हिडिओ शेयर करत प्रशांत दामले यांचं अभिनंदन केलंय.

मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मोठं नाव म्हणून प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडे पाहिले जाते. तीन दशकांहून अधिक काळ यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. दामलेंच्या अनेक नाटकांचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. एका दिवशी नाटकांचे 5-5 प्रयोग प्रशांत दामलेंनी केले आहेत.

Tags

follow us