लग्नाबाबत प्राजक्ताचा प्रश्न अन् श्री श्री रविशंकर यांचं सुंदर उत्तर
महाराष्ट्राची हास्य जत्रामधून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे. व्हायरल व्हिडिओमध्ये प्राजक्ता आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या बंगळुरूतील आश्रमात दिसत आहे. तिथे तिने प्रवचनालाही हजेरी लावली होती. प्रवचनादरम्यान तिने श्री श्री रविशंकर यांना विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर सध्या जोरदार व्हायरल झालंय.
महाशिवरात्रीदरम्यान प्राजक्ता माळी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून काही दिवस बंगळुरूतील आश्रमात गेली होती. तिथे तिने आपला बराचसा वेळ ध्यान धारणा आणि मनन चिंतनात घातला. तसेच भगवान शंकराचीही मनोभावे पूजा केली होती. त्याबाबतचे काही फोटोही प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. तसेच तिने श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनातही उपस्थिती लावली. तिथे तिने लग्न करणे सक्तीचं आहे का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर लोकांसोबतच रविशंकर यांनाही हसू अनावर झाले. मात्र यानंतर रविशंकर यांनी दिलेलं उत्तरही तुम्हा आम्हाला मंत्रमुग्ध करणारे होते.
View this post on Instagram
प्राजक्ताच्या प्रश्नावर काय म्हणाले श्री श्री रविशंकर?
अभिनेत्री प्राजक्ता माळींच्या लग्नाबाबतच्या प्रश्नावर आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर म्हणतात… ‘तू मला विचारत आहेस, असं असतं तर कधीच माझ्या बाजूला आणखी एक खुर्ची लागली असती. लग्न केलेच पाहिजे असं काही नाही. खूश राहणं महत्त्वाचं आहे, तुम्ही लग्न करून खूश राहा किवा एकटं खूश राहा. काही लग्न करूनही दुखी असतात. तुम्ही निवडा तुम्हाला नेमकं कसं राहायचं आहे. आनंदी राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.’ प्राजक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
प्राजक्ताच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जबरदस्त कमेंट केल्या आहेत. एक प्रेक्षक म्हणतो, व्वा प्राजू छान प्रश्न. तर दुसरा एक नेटकरी म्हणतो… मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे करशील का एका सर्वसामान्य शेतकरी मुलासोबत लग्न? तर आणखी एक जण विचारतो, प्राजक्ता मुळात हा प्रश्नच तुला का पडला असावा!
प्राजक्ता माळीची व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीचीही पोस्टही आली होती चर्चेत.
व्हॅलेंटाईनच्या दिवशी प्राजक्ताने गुलाबी साडीतील सुंदर फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते, यावेळी तिने सिंगल तरुणांना साद घालत पोस्टमध्ये लिहिले होते, अखिल भारतीय single संघटनेचे सदस्य. तुम्ही एकटे नाही.., मी ही तुमच्यात सहभागी आहे.
‘तुम्ही एकटे नाही…’ प्राजक्ताची सिंगल तरूणांना साद