Madhugandha Kulkarni Video: मराठी सिनेसृष्टीत अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्या उत्तमरित्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात. अभिनयाबरोबर लेखन, व्यवसाय यामध्ये देखील त्या पारंगत आहेत. अशी एक अभिनेत्री म्हणजे मधुगंधा कुलकर्णी. नाटक, मालिका, चित्रपट, साहित्य या सर्व माध्यमांमध्ये लेखक आणि अभिनेत्री म्हणून लीला वावरणाऱ्या कलाकार म्हणून मधुगंधा (Madhugandha Kulkarni) यांना ओळखले जाते. आणि आता अभिनेत्रीचे प्राणी प्रेम पाहायला मिळाले आहे.
ऐन दुपार, ऊन मी म्हणत होत, फार्म हाऊसकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. रसवंती गृहाजवळ थांबले. माझ्या बरोबर फार्मचा केअर टेकर आणि ओंकार होते. रस बनत होता. बाजूला एक छोटा कत्तलखाना, शेवटचं राहिलेलं मटण तो वजन करून. गिऱ्हाईकाला देत होता. मला असं वाटलं इथे का थांबलो? रसाची ऑर्डर already केली होती; थांबण्याशिवाय पर्याय नव्हता.
तिथे एक छोटं कुत्र्यांचं पिल्लू होत, ते केकाटल म्हणून बाजूला गेले. मटण शॉप मध्ये दोन निर्विकार चेहऱ्याची दांडगी माणसं, त्यातल्या एकाने पिल्लाला लाथ मारली होती. मी त्यांना म्हणल कशाला मारता दादा पिल्लाला? त्याने माझ्याकडे तुच्छतेने पाहिलं आणि भल्या मोठ्या सुरीशी चाळा करत राहिला. त्याचवेळी दुसरं गिऱ्हाईक आल त्यांना चार किलो मटण हवं होत. त्यांच्या मुलाचा 14वा वाढदिवस आहे, म्हणून पार्टी करायची होती. कसाया मधला एक माणूस मागे गेला. तिथे एक छोटं बकरीच पिल्लू कुणालाही दिसणार नाही अश्या बेतान बांधलं होतं.
आडदांड माणूस त्या पिल्लाला खेचून आणू लागला. त्या पिल्लाला कळलं होत, त्याला आता मारणार! ते रेझिस्ट करण्याचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न करत होत, पण त्याची ताकत ती किती! इकडे हातामधे मोठी सुरी घेवून दुसरा कसाई गिऱ्हाईक बरोबर बार्गेन करत होता. चार किलो 2000 का 2500 यावर चर्चा. छोट्या बकऱ्याची सुटण्याची तडफड, त्याच एक तंगड धरून कसाई खेचत होता. ते तुटल तरी चालणार होत कारण एनी वे त्याला कपायचचं होतं! पिल्लाची तडफड मला पाहावेना. सौदा पटला नाही. गिऱ्हाईक जावू लागला. पिल्लाच्या करुण आणि असहाय आवाजाने मी अस्वस्थ. माझा उसाचा रस तयार होता. मी सुन्न. त्या पिल्लाला आडवा पाडला. बघवेना! गिऱ्हाईक परत आला. ते ओळखीचे असावेत. म्हणाला, मुलाचा 14था वाढदिवस आहे, थोडे कमी कर. कसाई म्हणाला 4 महिने पोसला मी बकर्याला! आता बकरीचे चारही पाय धरुन ठेवले होते. आणि मानेवर कोपर ठेवून दुसरा कसाई उभा. खाली पिल्लू घुसमटून फडफडत होत. ह्यांची चर्चा सुरू.
आपण कुणीही ती तडफड पाहू शकत नाही. त्या पिल्लाची सुटकेसाठी धडपड चालूच होती. आर्त आवाज. मी मध्ये गेले- म्हणाल मला हा बकरा दे. गिऱ्हाईक 2 हजारवर अडून होत. कासायाला 2500 हवे होते. गिऱ्हाईक गेलं. कसाई माझ्याकडे संशयाने पाहू लागले. ओंकार आणि माझ्या केअर टेकरला एव्हाना अंदाज आला होता. ते आले. ओंकार म्हणाला, “हम इसे फॉर्म पे ले जायेंगे” तो अजून संशयाने बघत होता. मग त्याने अजून पैसे सांगितले. पूर्ण बकरा सहा हजाराच्या खाली यायला तो तयार होईना . थोडी घासाघीस करून 5500 हजाराला बकरा घेतला. कासायाने गाडीत ठेवला. त्याच संपूर्ण शरीर थरथरत होत. कळपातून त्याला काढल होत. इथे बांधलं होत. त्याचा त्याच्याच वयाचा भाऊ सकाळीच कापला गेला होता याच्या समोर. त्याला त्याच विधिलिखित कळलं होत. पण जीव आहे. वाचण्याची असहाय धडपड करत होता.
मी कसायला म्हणल, पाणी आहे का त्याला द्यायला. कसाई म्हणाला, “देवू नका! पूर्ण दिवस अन्न पाणी दिल नाहीय त्याला. कापायला सोप जात.” मी पाणी दिल. तो इतका घाबरला होता की त्याने पाण्याला तोंड लावलं नाही. गाडीमध्ये मी पहिल्यांदा हात लावला घाबरून तो पूर्ण थरथरला. त्याला कुठे नेणार आहेत, त्याच काय होणार आहे. त्याला कळत नव्हत. पण त्याच्या आयुष्याचा कंट्रोल त्याच्याकडे नव्हता. सगळ माणसांच्या हातात. त्यांचं आईपासून तुटण आणि कासायाकडे लहान वयात कटण हेच त्यांचं प्राक्तन आहे, माणसाने ठरवलेलं! कसाई म्हणाला आता घरी जावून दुसरा बकरा आणावा लागेल. पोटात गोळा आला. ह्याला वाचवल पण बळी अटळ आहे.
Ayushmann Khurrana: मेनस्ट्रीमचा पहिला पुरस्कार जिंकल्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला…
गाडी परत फार्म कडे वळवली फार्म वर नेलं. बकरा घाबरून अजूनही थरथरत होता. त्याला आत मोकळा सोडलं. तसा तो आवाज करून सैरावैरा धावू लागला कुणाला तरी शोधतोय , आवाज देतोय असं वाटलं. तो बहुदा त्याची आई, भावंडं किंवा कळपाला आवाज देत होता. बोलवत होता. आता फार्म वर अजून एक मेंबर! त्याच नाव मी कृष्णा ठेवलं. मुंबईला यायला निघाले. कसायाने दुकान बंद केलं होत. जीव भांड्यात पडला. आजचा त्याचा धंदा झाला होता. आणि कृष्णाचा अजून एक भाऊ अजून एक दिवस जगला होता.
परेश मोकाशी दिग्दर्शित आणि स्वप्नील जोशी निर्मित नाच गं घुमा हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते’, असं एक मोशन या चित्रपटाचं नुकतचं शेअर करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असल्याचं या चित्रपटाची लेखिका मधुगंधा कुलकर्णी हीनं सांगितलं होतं.