VIDEO : मी गुन्हेगार, काम थांबल्यामुळं रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडला; पण, सत्य मात्र वेगळंच
![VIDEO : मी गुन्हेगार, काम थांबल्यामुळं रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडला; पण, सत्य मात्र वेगळंच VIDEO : मी गुन्हेगार, काम थांबल्यामुळं रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडला; पण, सत्य मात्र वेगळंच](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Ranveer-Allahbadia-1_V_jpg--1280x720-4g.webp)
Youtuber Ranveer Allahbadia Crying Because Loss Of Work : एका रिअॅलिटी शोमध्ये अश्लील विनोद करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाचा (Ranveer Allahbadia) एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत रणवीर ढसढसा रडताना दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral) होतोय. रणवीर का रडतोय? हाच प्रश्न सर्वांना पडलाय. रणवीरच्या रडण्यामागील कारण समोर आलंय.
समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये आक्षेपार्ह विनोद केल्यामुळे युट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia Video) अडचणीत सापडलाय. त्याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणात शोसंबंधित काही लोकांची चौकशीही केलीय. दरम्यान, रणवीरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो ढसाढसा रडताना दिसत आहे. काम थांबल्यामुळे तो रडत असल्याचं व्हिडिओत दिसतंय. परंतु, सत्य काही वेगळचं आहे.
लव फिल्म्स निर्मित ‘देवमाणूस’चा टीझर लाँच! छावा सिनेमासोबत सर्व चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
व्हिडिओमध्ये रणवीर रडताना दिसतोय. त्याने पांढरा टी-शर्ट घातला आहे. तो म्हणतोय की, माझं सगळे काम थांबलं असल्यामुळं मला वाईट वाटतंय. मला गुन्हेगार असल्यासारखे वाटतंय. यामुळे संपूर्ण टीमवर वाईट वेळ आलीय. माझ्यामुळे सगळं काम थांबलं. मला हे व्हीलॉग करायचे नाहीये. रणवीरला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होतोय, त्यामुळे तो रडत असल्याचा दावा केला जातोय.
व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?
खरंतर, रणवीर अलाहाबादिया रडतानाचा हा व्हिडिओ खूपच जुना आहे. हा व्हिडिओ कोरोना काळातील आहे. रणवीर अलाहाबादियाने स्वतः हा व्लॉग त्याच्या यूट्यूबवर शेअर केला होता. तीन वर्षांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान त्याने हा व्हिडिओ शेअर केला होता. हे क्लिकबेट नाहीये. व्लॉग 24, कोरोनासोबतचा माझा अनुभव, असं कॅप्शन त्यानी या व्हिडिओला दिलंय. तेव्हा कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याचं काम थांबवण्यात आलं होतं. यूट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला रणवीरची कोरोना चाचणी दाखवली गेलीय. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रणवीर अस्वस्थ होतो अन् त्याच्या व्लॉगमध्ये रडायला लागतो. रणवीरचा हा जुना व्हिडिओ आता व्हायरल होतोय.
आज पुन्हा निवडणुका झाल्या तर… जनतेचा कौल कोणाला? सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा
नेमका वाद काय आहे?
काही दिवसांपूर्वी रणवीर अलाहाबादिया युट्युबर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कॉमेडी शोमध्ये आला होता. येथे त्याने पालकांबद्दल असभ्य टिप्पणी केली, ज्यामुळे तणवा निर्माण झाला. सोशल मीडियावर रणवीर आणि समयच्या शोवर टीका झाली. अनेक ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी शोशी संबंधित 30 लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आणि तपास सुरू केला. सायबर पोलिसांनी युट्यूबला पत्र लिहून समयच्या शोमधील सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ काढून टाकण्यास आणि चॅनेलवर कारवाई करण्यास सांगितलं.