Download App

Madhuri Dixit: धकधक गर्लने सांगितलं झणझणीत मिसळ पाव बनवण्याचं सिक्रेट, Video Viral

Madhuri Dixit Misal Recipe Video: बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही आपल्या नृत्यासाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी मोठ्या प्रमाणात ओळखली जात असते. तसेच सोशल मीडियावर देखील धकधक गर्ल प्रचंड प्रमाणात चर्चेत येत असते. (Misal Recipe Video) ती आपल्या चाहत्यांना कायमच अपडेट ठेवत असते. (Video Viral) गेल्या काही दिवसापासून ती (Social media) आपला मुलगा रियानमुळे चांगलच चर्चेत आली होती.

रियाननं आपली हायस्कूल डिग्री पूर्ण केली आहे. यामुळे याचा फोटो माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यावर त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा पाऊस पाडला होता. आता धकधक गर्लची अजून एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच धूमाकूळ घालत आहे.यामुळे तिची चर्चा चांगलीच रंगत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये धकधक गर्लने चक्क मिसळ बनवत असताना दिसून आली आहे.


मिसळ हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच खुपच मोठ्या प्रमाणात आवडतो. आपण देखील तो अगदी आवडीने खात असतो. आपण कुठेही फिरायला गेलो आणि आपल्याला जर का मिसळ खायची असेल तर आपण त्यावर ताव मारल्याशिवाय राहत नाही, तेव्हा आपण दखील मिसळ खाण्यासाठी जिवाचं अगदी रानच करुन टाकतो, डोळ्यात पाणी येईपर्यंत आपण मिसळ खाण्याची धडपड करत असतो.यामुळे मिसळ खाण्याची हौस ही आपल्या सर्वांना आहे.

सध्या धकधक गर्लला ही याचा मोह आवरता आला नाही. धकधक गर्लने असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तेव्हा सगळीकडे फक्त ‘त्या’ व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला देखील माहिती आहे की, धकधक गर्लचं स्वत:च युट्यूब चॅनल आहे. ती आपल्या युट्यूब चॅनलवरून नवनवीन पदार्थ आपल्या नवऱ्यासोबत बनवत असल्याचे दिसून येत असते. यामुळे तिचे हे व्हिडीओ सतत चर्चेत येत असतात.

आत्तापर्यंत त्यांनी अनेक व्हिडीओ तयार केले आहेत. त्यामुळे त्यांच्या या व्हिडीओला देखील मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या त्यांनी अपलोड केलेल्या मिसळ पावच्या रेसिपीच्या व्हिडीओला देखील मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत. यावेळी धकधक गर्ल ही मिसळ कशी बनवायची आणि तीही हेल्थी मिसळ कशी बनवायची याची माहिती देत असल्याचा हा व्हिडिओ आहे. यावेळी त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये मिसळ बनवायचे साहित्य, त्याचे प्रमाण आणि कृती सांगितली आहे.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

यामध्ये किती कॅलरीज असतात, यावर देखील त्यांनी मोठे भाष्य केले आहे. सध्या त्याचा एक छोटासा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. धकधक गर्ल आणि डॉ. श्रीराम नेने हे मराठी आहेत. त्यामुळे त्या दोघांना अनेक मराठी पदार्थंचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचे दिसून येत असतात. यावेळी त्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. यामुळे तुम्हालाही घरच्या घरी मस्त चमचमीत मिसळ करायची असेल तर तुम्हीही हा व्हिडीओ नक्कीच पाहू शकणार आहात.

Tags

follow us