Download App

Madhuri Dixit: बिग बींच्या ‘या’ सिनेमाच्या सीनसाठी दिग्दर्शकानं माधुरीला ब्लाऊज काढायला सांगितला अन्…

Tinu Aanand: सिनेमा दिग्दर्शक टीनू आनंद यांनी माधुरी दीक्षितबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका सीनसाठी माधुरी आणि दिग्दर्शकामधील वाद चांगलाच टोकाला गेला होता. बॉलिवूड (Bollywood) मधील ‘धकधक गर्ल’ म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit) ओळखला जात. तिने अभिनय आणि सौंदर्याने संपूर्ण मनोरंजन क्षेत्र हादरवून सोडली आहे. (Amitabh Bachchan) तसेच अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमा दिल्याचे बघायला मिळाले आहे. आज माधुरी सर्वांची आवडती अभिनेत्री आहे.


परंतु माधुरीचा इथपर्यंतचा प्रवास हा फार कठीण परिस्थिचा होता. एका सिनेमासाठी तर दिग्दर्शकाने अशी मागणी घातली होती की माधुरीला अक्षरशा राग अनावर झाला होता. दिग्दर्शकाबरोबर वाद झाल्यानंतर तिला अक्षरशः सिनेमातून काढून टाकण्यात आले होते अभिनेता दिग्दर्शक, निर्माते, लेखक टीनू आनंद यांनी नुकताच एका दिलेल्या मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षितबद्दल सांगितले आहे. या मुलाखतीत त्यांनी माधुरी दीक्षितच्या एका सिनेमाचा किस्सा सांगितला आहे.

१९८९ साली ‘शनाख्त’ हा सिनेमा येणार होता. या सिनेमाचे जोरदार काम सुरु होते. या सिनेमात बिग बीं आणि धक धक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सिनेमातील एका सीनसाठी माधुरीला ब्लाऊज काढून ब्रावर सीन शूट करण्यास सांगण्यात आले होते. चित्रीकरणाच्या अगोदरच माधुरीला सिनेमाचा सीक्वेन्स समजावण्यात आला होता. परंतु जेव्हा शुटिंग सुरु झाले, तेव्हा त्या सीनच्या दिवशी माधुरी एक तास मेकअप रुममधून बाहेर आली नाही. जेव्हा तिला विचारण्यात आले की नेमके काय झाले, त्यावेळेस तिने सांगितले की ती हा सीन करु शकत नाही.

Kangana Ranaut: ‘जवान’चं कंगनानं केलं तोंडभरुन कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘शाहरुख हा…’

यावर दिग्दर्शक टीनू म्हणाले की, ‘मी तिची माफी मागितली आणि तिला हा सीन करावाच लागेल असे सांगितले होते. परंतु माधुरी तिच्या गोष्टीवर ठाम होती. यामुळे पॅकअप करायला लावला होता. तिला या सिनेमाला रामराम ठोकायला सांगितला आणि सगळे शुटिंग रद्द केले. त्यावेळेस बिग बीं सेटवर पोहोचले आणि म्हणाले की जाऊ द्या. जर तिला त्रास होत असेल तर. तिच्याशी वाद का घालत आहात? मी तिला याबद्दल अगोदरच सांगितले होते. जर ती तयार नव्हती तर सिनेमाला होकार का दिला’ होता. हा किस्सा त्याने यावेळी सांगितलं आहे.

Tags

follow us