Mahadev Betting App Actor Sahil Khan in police Custody : महादेव अॅप बेटिंग ( Mahadev Betting App ) प्रकरणाची चर्चा देशभरात आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याआधी साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर पोलिसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन साहिल खानला ताब्यात घेतले. तर आता त्याला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी ( police Custody ) सुनावण्यात आली आहे.
पवारांनी तुमचं राजकारण संपवलं तेव्हा आम्ही साथ दिली; फडणवीसांची मोहिते पाटील कुटुंबावर टीका
याआधी गुरुवारी एसटीएफने दोन गुन्हेगारांना अटक केली होती. यातील एक आरोपी हा दुबईत असलेल्या सूत्रधाराचा चुलत भाऊ आहे. याला या कंपनीचे देशाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. द लायन बूक अॅप नावाच्या अॅपमध्ये साहिल खान भागीदार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली होती. मुंबई पोलीस आयुक्तालयातही त्याची चौकशी करण्यात आली होती. सध्या पोलिसांनी त्यााल फक्त ताब्यात घेतले आहे. पुढे पोलीस त्याला अटक करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एका व्यासपीठावर येताच जरांगेंकडून पंकजांना खुर्ची, पंकजांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस
साहिल खानने अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केला होता. न्यायालयाने मात्र ही याचिका फेटाळली. त्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. पुढे गोवा, कर्नाटक, हैद्राबादमार्गे छत्तीसगडमध्ये पोहोचला. मुंबई पोलिसांचे पथकही त्याचा शोध घेत होतेच. अखेर त्याला छत्तीसगडमधील जगदलपूर येथून ताब्यात घेण्यात आले. आता त्याला लवकरच मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.