Mahadev Betting App प्रकरणात मुंबई कनेक्शन उघडकीस, ‘हा’ अभिनेता आला अडचणीत

Mahadev Betting App प्रकरणात मुंबई कनेक्शन उघडकीस, ‘हा’ अभिनेता आला अडचणीत

Mahadev Betting App Case : गेल्या काही दिवसांपासून देशात चर्चेत असणारा 15000 कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App) प्रकरणात आज बॉलीवूड (Bollywood) अभिनेता आणि फिटनेस बिझनेसमॅन साहिल खानची (Sahil Khan) एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात यापूर्वी देखील साहिल खानला एसआयटीकडून (SIT) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते मात्र त्यावेळी तो देशाचे बाहेर असल्याने चौकशीला हजर राहू शकला नव्हता.

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात डिसेंबर 2023 मध्ये माटुंगा पोलिसांकडून (Matunga police) गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतर पुढील तापासाठी गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आणि यानंतर एसआयटी स्थापन करून तपास पुढे नेण्यात आला. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात दीक्षित कोठारी (Dixit Kothari) या आरोपीला अटक केली असून मुबई पोलिसांनी 15 हजार कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली महादेव बेटिंग ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उपल, सुभम सोनी यांच्यासह 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी साहिल खानची देखील आरोपी म्हणून या गुन्ह्यात नोंद केली आहे. याच बरोबर बॉलीवूडच्या आणखी काही स्टार्सची या प्रकरणात आरोपी म्हणून नोंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

15 हजार कोटींची फसवणूक

माटुंगा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदार प्रकाश बनकर यांच्या जबाब घेऊन या प्रकरणात एफआयआर नोंदवली आहे. महादेव ॲपची उपकंपनी खिलाडी ॲपचा प्रवर्तकासह उद्योगपती मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्यासह 32 आरोपींची नावे एफआयआरमध्ये नोंदवण्यात आली आहे. माहितीनुसार, 7 नोव्हेंबरला कुर्ला दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्देशानुसार माटुंगा पोलिसांनी एफआयआर दाखल केली होती. 2019 पासून ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्सद्वारे आतापर्यंत अंदाजे 15 हजार कोटींची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी एफआयआरमध्ये केला आहे.

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भूपेश बघेल यांच्या विरोधात या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात अशा वेगवेगळ्या प्रकरणांशी संबंधीत कलमांतर्गत आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 11 अंतर्गत भूपेश बघेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भूपेश बघेल यांनी यूएई येथील या ॲपच्या प्रमोटर्सकडून कथितरित्या 508 कोटी रुपये घेतल्याचे आरोप करण्यात आले आहे. महादेव बेटिंग ॲपच्या माध्यमातून क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल सारख्या खेळांवर यासोबतच निवडणुकांवर अवैध सट्टा लावला जायचा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube