मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्याच्या मुलावर ईडीची रेड; दारू घोटाळ्याचं कनेक्शन काय?

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्याच्या मुलावर ईडीची रेड; दारू घोटाळ्याचं कनेक्शन काय?

Chhattisgarh News : छत्तीसगड दारू घोटाळ्यात ईडीने मोठी कारवाई केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या मुलावर कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. ईडीने (Chhattisgarh News) जवळपास 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. ईडीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की चैतन्य बघेल यांचे नाव या प्रकणात समोर आले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ईडीने याआधीही कारवाई केली होती. मे 2024 मध्ये माजी आयएएस अधिकारी अनिल टुटेजा आणि रायपूरचे महापौ एजाज ढेबर यांचे भाऊ अन्वर ढेबर यांच्यासह अनेकांची 18 चल आणि 161 अचल संपत्ती जप्त करण्यात आली होती. या संपत्तीचे मूल्य अंदाजे 205.49 कोटी रुपये आहे. ईडीने ज्या संपत्ती जप्त केल्या होत्या त्यात अनिल टुटेजा यांच्या 14 संपत्तीचा समावेश आहे. 115 संपत्ती अन्वर ढेबर यांच्या होत्या. यासह विकास अग्रवाल यांच्याही 3 संपत्ती होत्या. 33 प्रॉपर्टी अरविंद सिंह यांच्या होत्या. अरुण पति त्रिपाठी यांची जवळपास 1.35 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

महादेव अ‍ॅप प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई पोलिसांनी अभिनेत्याला छत्तीसगडमधून उचलले

काय आहेत आरोप

ईडीनुसार 2017 मध्ये दारू खरेदी आणि विक्रीसाठी सीएसएमसीएल गठीत करण्यात आली होती. परंतु, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सिंडीकेटने यावर नियंत्रण मिळवले. सीएसएमसीएल संबंधित कामांसाठी सर्व कंत्राटे या सिंडीकेटशी संबंधित लोकांना दिले जात होते असा आरोप आहे. ईडीने असाही दावा केला जात आहे की सिंडीकेटने बैकायदेशीर पद्धतीने दारू विक्री करुन मोठे कमिशन मिळवले. ही रक्कम अन्वर ढेबर याला दिली गेली. यानंतर त्याने ही रक्कम राजकीय पक्षांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारला आर्थिक फटका

या दारू घोटाळ्यामुळे राज्य सरकारला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. दारू सिंडीकेटने अपराध उत्पन्नाच्या रुपात 2100 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांची हेराफेरी केली. या प्रकरणात राज्य सरकारचे काही अधिकारी आणि व्यापाऱ्यांना आधीच अटक करण्यात आली आहे.

या घोटाळ्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. या प्रकरणी ईडी, एसीबीने गुन्हे दाखल केले आहेत. या एफआयआरमध्ये 2 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. तत्कालीन बघेल सरकारच्या काळात आयएएस अधिकारी अनिल टुटेजा, अबकारी विभागाचे एमडी एपी त्रिपाठी आणि व्यापारी अन्वर ढेबर यांच्या सिंडीकेटच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आल्याचे तपासात आढळू आले होते.

Breaking..! छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; चकमकीत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube