‘Maharaja’ Hindi remake Amir Khan in lead role : नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीचा ‘महाराजा’ (Maharaja Movie) हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक देखील बनवण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता लागलेली असताना आता अभिनेता अमिर खानचं (Amir Khan) नाव या भूमिकेसाठी पुढं आलं आहे.
PV Sindhu : पीव्ही सिंधूची विजयी सलामी; पहिल्या सामन्यात एफएन अब्दुल रझाकचा केला पराभव
दरम्यान अभिनेता आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसने या चित्रपटाचे हिंदीमध्ये रिमेक बनवण्यासाठी हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची केवळ निर्मितीच नाही. तर मूळ चित्रपटामध्ये विजय सेतूपतीने साकारलेली चित्रपटातील मुख्य भूमिका हिंदीतील रिमेकमध्ये स्वतः आमिर खान साकारणार आहे. आमिर खान आणि विजय सेतु पती यांच्या बद्दल बोलायचं झालं तर आमिरच्या लालसिंग चढ्ढा या चित्रपटासाठी विजयला विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यावेळी ती शक्य झालं नाही. त्यानंतर विजय सेतू पतीने शाहरुख खानच्या जवानमध्ये काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
कसा आहे महाराजाचा ट्रेलर?
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. पोलीस ठाण्यात स्वत:ला ‘महाराज’ म्हणवून घेणाऱ्या विजय सेतुपतीच्या पात्रापासून सुरुवात होते. त्यांनी के.के. गावात एक नाई आहे आणि तो चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी येतो. कोणीतरी त्यांच्या घरात घुसून त्यांची ‘लक्ष्मी’ चोरल्याचा त्यांचा दावा आहे.
पंकजा मुंडे पुन्हा आमदार, विधानपरिषद सदस्यत्वाची घेतली शपथ; खोत, नार्वेकरही आमदार
सर्व प्रयत्न करूनही ‘लक्ष्मी’ म्हणजे काय हे शोधण्यात पोलिसांना यश येत नाही. मात्र, यावरून हे स्पष्ट होते की,’लक्ष्मी’ म्हणजे ना पैसा, ना सोने, ना कागदपत्र किंवा अन्य कोणतीही मौल्यवान वस्तू. जेव्हा विजय सेतुपती समजावण्याचा प्रयत्न करतात की ‘लक्ष्मी’ ना त्यांची पत्नी आहे ना त्यांची मुलगी. यानंतर पोलिसांचा संशय बळावला. चोरीच्या रात्री घडलेली महत्त्वाची गोष्ट महाराज लपवत असल्याचा पोलिसांचा समज आहे. त्यामुळे चित्रपट नेमका कसा आहे. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल एवढं नक्की
महाराजा स्टारकास्ट
ममता मोहनदास, नट्टी (नटराज), भारतीराजा, अभिरामी, सिंगमपुली, अरुलदोस, मुनीषकांत, विनोद सागर, बॉईज मणिकंदन, कल्की आणि सचना नमिदास हे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय सेतुपती आणि अनुराग कश्यप यांचाही यात सहभाग आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक निथिलन समनाथन आणि सुधन सुंदरम आहेत.