सुबोध भावे दिसणार नव्या बायोपिकमध्ये, हिंदीत साकारणार नीम करोली बाबांची भूमिका!

Subodh Bhave हा लवकरच हिंदीमध्ये झळकणार आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर करत माहिती दिली. यामध्ये सुबोध नीम करोली बाबा ही भूमिका साकारणार आहे.

Subodh Bhave

Subodh Bhave New Biopic in Hindi as Nim Karoli Baba : मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावे हा त्याच्या अभिनय आणि दिग्दर्शनासह त्याच्या चरित्र चित्रपटांसाठी जास्त ओळखला जातो. बाल गंधर्व, लोकमान्य एक युगपुरूष या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका आणि चित्रपट प्रचंड गाजले आहेत. त्यानंतर आता सुबोध आणखी एका बायोपिकमध्ये दिसणार आहे. मात्र हा चित्रपट हिंदीतील असणार आहे.

आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही; भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा

त्यामुळे सुबोध भावे हा लवकरच हिंदीमध्ये झळकणार आहे. याबाबत स्वत: सुबोधने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यानुसार या चित्रपटामध्ये सुबोध हा नीम करोली बाबा ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर देखील या पोस्टमध्ये शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये सुबोध भावेने या चित्रपटाबद्दल माहिती दिली.

https://www.instagram.com/p/DO-4bdHjVUI/?utm_source=ig_embed&ig_rid=e9de9c22-e0fb-4487-a121-eb92da31e61d

छत्रपती संभाजीनगर रस्ता दुरुस्ती करा नाहीतर रस्ता रोको आंदोलन; खासदार लंकेंचा चार दिवसांचा अल्टिमेटम

आज लखनऊ मध्ये आमच्या आगामी ” बाबा निंब करोली” यांच्या आयुष्यावर आधारित हिंदी चित्रपटाच्या पोस्टर च अनावरण संपन्न झाले. बाबांची भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले. लवकरच हा चित्रपट रसिकांसमोर येईल. जय श्रीराम! जय हनुमान! या चित्रपटाचं दिग्दर्शन मधूर भंडारकर यांनी केलं आहे.

कोण आहेत बाबा नीम करोली?

बाबा नीम करोली हे महाराज भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि आदरणीय संतांपैकी एक होते. त्यांचे अजूनही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भक्त आहेत. अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि मेटाचे संस्थापक यांनीही बाबांची भेट दिली होती. आता संतांच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवला जात आहे. हा चित्रपट 2 तास 45 मिनिटांचा असेल आणि त्यात 1908 ते 1973 पर्यंत बाबांचे जीवन दाखवले जाईल. वृंदावनमधील बाबांच्या समाधी स्थळ आणि आश्रमात झालेल्या चर्चेत चित्रपटाचे दिग्दर्शक शरद ठाकूर यांनी सांगितले की, चित्रपट पूर्ण झाला आहे.

follow us