Asambhava80s : ‘असंभव80s‘च्या ट्रेंडची कलाकारांना भुरळ; चित्रपटातील 80s लूकची सर्वत्र चर्चा
Asambhava80s : सध्या सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्सची रेलचेल सुरू असतानाच मराठी चित्रपटसृष्टीत एक अनोखा आणि आकर्षक ट्रेंड जोरदार
Asambhava80s : सध्या सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्सची रेलचेल सुरू असतानाच मराठी चित्रपटसृष्टीत एक अनोखा आणि आकर्षक ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सचित पाटील दिग्दर्शित ‘असंभव’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला ‘#असंभव80s’ हा ट्रेंड सेलिब्रिटींपासून ते प्रेक्षकांपर्यंत वेगाने पसरत आहे.
एआयच्या मदतीने 80 च्या दशकातील लूक साकारून या ट्रेंडमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सुमित राघवन, अंकुश चौधरी, अवधुत गुप्ते, सुबोध भावे, अभिजीत पानसे, आनंद इंगळे, संतोष जुवेकर, पुष्कर श्रोत्री, सुयश टिळक, प्रिया बेर्डे, रेशम टिपणीस, कविता लाड, गौरी कुलकर्णी याच्यासह अनेक कलाकारांनी त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या कलाकारांच्या 80 च्या दशकातील लूकवर चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रियाही येत आहे.
‘असंभव80s’ हा ट्रेंड व्हायरल होण्याचे कारण म्हणजे ‘असंभव’ चित्रपटातील 80च्या दशकातील ग्लॅम लूक! चित्रपटातील कलाकारांच्या गेटअपने सर्वांनाच भुरळ घातली आहे. रिलीजपूर्वीच सोशल मीडियावर मिळत असलेला प्रतिसाद हा चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहे. चित्रपटातील वेशभूषा, रंगसंगती, सेट डिझाइन आणि कलाकारांचे गेटअप आधीच चर्चेचा विषय झाले आहेत.
‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. मराठीतील चार गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत.
The Ashes 2025 पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला; मोडला तब्बल 100 वर्षांचा रेकॉर्ड
मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. ‘असंभव’ हा चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
