Download App

‘संयुक्त महाराष्ट्र’ चळवळीचा लढा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार, नवीन मराठी चित्रपटाची घोषणा

Samyukta Maharashtra Announcement: स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारण्यात आला.

Samyukta Maharashtra Announcement: स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र (Samyukta Maharashtra ) चळवळ हा लढा उभारण्यात आला. (Samyukta Maharashtra Announcement) ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीतील एक प्रमुख चळवळ होती. (Maharashtra Day ) आजवर झालेल्या अनेक चळवळी या इंग्रजांविरोधातील होत्या. मात्र ही चळवळ वेगळी होती.

यामुळे देशाचे राजकारण कोलमडले आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आज याच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स प्रस्तुत ‘संयुक्त महाराष्ट्र’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘पॅावर वर्सेस प्राईड’ अशी टॅगलाईन आहे .तर सुनील शेळके (Sunil Shelke) ‘संयुक्त महाराष्ट्रा’चे निर्माते आहेत.

‘BMCM’कडून प्रेक्षकांची निराशा; ‘मैदान’ला अधिक पसंती, वाचा तिसऱ्या आठवड्यात किती झाली कमाई

2025 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात कोण कलाकार झळकणार हे येत्या काळात कळलेच. चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात, ‘’ ही चळवळ आजवरची सयुँक्त महाराष्ट्राची सर्वात मोठी चळवळ होती. राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक अशा सगळ्याच बाजुने ही चळवळ होती. चित्रपटात हेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

follow us

वेब स्टोरीज