Independence Day : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनी (79th Independence Day) व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील (Swati Mhase Patil) यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले.
यानिमित्ताने व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी शिस्तबद्ध संचलन केले. यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह विभागाचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी, परिसरातील शालेय मुल उपस्थित होते.
दरम्यान चित्रनगरीमध्ये “माझी चित्रनगरी हरित चित्रनगरी” उपक्रम राबविण्यात येत असून आज “बी द चेंज “ या संस्थेच्या माध्यमातून महामंडळातील अधिकारी-कर्मचारी यांना पर्यावरण पूरक पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. तर आय.पी.सी.ए या संस्थेमार्फत एरोबिनचे वाटप करण्यात आले.
मेकअप रूमचे लोकार्पण
चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी येणाऱ्या कलाकारांकरिता अत्याधुनिक सोई-सुविधायुक्त तयार करण्यात आलेल्या चार नव्या मेकअप रूमचे लोकार्पण व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
“स्वातंत्र्य चळवळ अन् आरएसएसचा संबंध काय?, आज देशात”, सपकाळांचा पीएम मोदींना थेट सवाल
एनडी स्टुडिओमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महामंडळ अंतर्गत कार्यरत असणारे एनडी स्टुडिओमध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक लेखाधिकारी महेश भांगरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.