Gautami Patil Dances Video: ‘घुंगरु’ घेऊन गौतमी पाटील लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

Gautami Patil Dances Video : सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री गौतमी पाटील (Gautami Patil ) लवकरच घुंगरू नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. नृत्य कलावंतांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. (Gautami Patil Pandharpur ) गौतमी पाटील हिला राज्यभरातून विविध कार्यक्रमासाठी असलेली मागणी आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा सुद्धा अनेकांच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरत आहे.   View this post […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 06T102350.270

Gautami Patil

Gautami Patil Dances Video : सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री गौतमी पाटील (Gautami Patil ) लवकरच घुंगरू नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. नृत्य कलावंतांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. (Gautami Patil Pandharpur ) गौतमी पाटील हिला राज्यभरातून विविध कार्यक्रमासाठी असलेली मागणी आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा सुद्धा अनेकांच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरत आहे.


आजघडीला गौतमी पाटील एक असे व्यक्तीमत्व आहे. ज्याच्या नावाने गर्दी जमत आहे. तिच्या डान्सचे व्हिडिओ (Gautami Patil Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असताना आपल्याला दिसून येतात. तिच्या डान्समुळे ती अनेकदा वादात असली तरी आता ती सिनेमाच्या पडद्यावर (Gautami Patil Movie) झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे.


गौतमी पाटील हिचा ‘घुंगरु’ (Gautami Patil Ghungroo) नावाच्या सीनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. लावणीरुपात स्टेजवर पडलेले तिचे पाऊल प्रसिद्धीच्या रुपात तर यशस्वी ठरले आहे. आता अभिनयामध्ये देखील लोक तिला कसे स्वीकारतात याबाबत लवकरच आपल्याला दिसून येणार आहे. परंतु, घुंगरू नावाच्या चित्रपटात गौतमीसोबत अभिनेता कोण असणार याची देखील चर्चा सध्या रंगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाबा गायकवाड यांचे नाव छापले आहे. बाबा गायकवाड हेच या चित्रपटाची निर्मिती आणि लेखन करत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, गौतमी पाटील बरोबर तेच स्क्रीनही शेअर करणार असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटातील दृश्यं सोलापूर (Solapur), माढा (Madha), हंपी (Hampi) आणि विदेशातही शूट झाल्याचे सांगितले जात आहे. एका टीव्ही मालिकेतून बाबा गायकवाड हे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. आता ते चित्रपटात देखील काम करणार असल्याची चर्चा होत आहे.


गौतमी पाटील आधीपासूनच चर्चेत राहिलेले व्यक्तीमत्व आहे. सर्वाधिक चर्चा असते ती तिच्या डान्सची. लावणीच्या नावाखाली ती करत असलेल्या डान्समध्ये ती ज्या प्रकारचे हावभाव करत असते, त्यावर अनेकांचा आक्षेप आहेत. लावणीसम्राज्ञी म्हणून महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे अशा सुरेखा पुणेकर, छाया खुटेगावकर, यांच्याबरोबरच अनेकांनी तिच्या लावणी नामक नृत्यावर आक्षेप घेतला आहे.

Malaika Arora दुसऱ्यांदा लग्न करणार का? म्हणाली, मी लग्नाबद्दल विचार केला आहे, पण….’

गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणजे आजच्या घडीला तरुणांच्या गळ्यातील ताईत. नृत्यात ती करत असलेले हावभाव बघून अनेक तरुणांवर राज्य करत आहे. यामुळे महाराष्ट्रातून गौतमीच्या कार्यक्रमांना जोरदार मागणी असते. तसेच, तिचे कार्यक्रमांना मोठी गर्दी देखील होते. गौतमी पाटील हिचे लावणी आणि विविध कार्यक्रमांतील व्हिडिओही जोरदार व्हायरल होत असताना आपल्याला दिसत आहे.

Exit mobile version