Download App

‘महाराष्ट्र्र शाहीर’च्या गाण्याने पार केला 1 मिलियन्सचा टप्पा, पाहा पडद्यामागची कहाणी

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत. मराठी प्रेक्षकही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. आताही असाच एक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ ​​महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र शाहीर’ (‘Maharashtra Shaheer’) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा दमदार टीझर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते प्रदर्शित झाला.

त्यानंतर या चित्रपटातील गाणं ‘गाऊ नको किसना’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे अल्पावधीत ‘गाऊ नको किसना’ गाण्याने 1 Million पेक्षा अधिक व्ह्यूज चा टप्पा पार केला आहे. म्हणूनच, लहानग्या किसनाच्या चाहत्यांसाठी टीम ‘महाराष्ट्र्र शाहीर’ घेऊन आलीये एक खास भेट, ‘गाऊ नको किसना’ गाण्याची पडद्यामागची कहाणी.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेटने त्यांच्या युट्युब चॅनेलवरून या गाण्याची पडद्यामागची कहाणीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी गाण्याचं शुटींग कसं झालं? कोरीओग्राफरने देखील यामध्ये प्रतिक्रिया दिली आहे. केदार शिंदेंचं दिग्दर्शन यामध्ये दिसत आहे. अजय-अतुल यांनी हे गाणं कसं गायल हे देखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हे गाणं आईचा धाक आणि गाण्याची हाक, भजन-कीर्तन, भारुडं, ओव्यांमध्ये रमणाऱ्या लहानग्या किसनाचं हे गाणं आहे. हे गाणं जयेश खरे आणि मयूर सुकाळे यांनी गायलं असून गुरू ठाकूर यांनी ते लिहिलं आहे. तर अजय-अतुल यांनी त्याला संगीतबद्ध केले आहे. जयेश खरेच्या गाण्याचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरलं झालं होत. त्यानंतर त्याला या चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळाली. जयेश हा अहमदनगरच्या एका गावातील आहे.

मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर ज्यांनी जपला, मराठी लोकसंगीत, लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्यामुळे पोहोचली, त्या शाहीर साबळे यांच्या जीवनावरील चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले आहे. विशेष म्हणजे शाहीर साबळे यांची नात सना शिंदे या चित्रपतमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सना शिंदे ह्या शाहीर साबळे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे, तर अंकुश चौधरी हे शाहीर साबळेंच्या भूमिकेत दमदार अंदाजात दिसत आहेत. टीझरमधील अंकुशच्या विविध लुक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा टीझर रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

न्यायालयाचा दिलासा! चुंबन प्रकरणी शिल्पा शेट्टीला जुनाच आदेश कायम 

या टीझरची सुरुवात अंकुश साकारत असलेल्या शाहीर साबळे यांची झलक दिसण्यापासून होते. तर त्या पाठोपाठ या टीझरमध्ये शाहीर साबळेंच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि दिग्गज व्यक्ती या दिसत आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर यांचा समावेश आहे. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास मेजवाणी ठरणार आहे.

शाहिरांचा जीवनप्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी केदार शिंदे हे गेल्या 15 वर्षांपासून या तयारी करत आहेत. दरम्यान, आता हा चित्रपट 28 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षक भारावले आहेत. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला मिळणार हे मात्र नक्की.

Tags

follow us