न्यायालयाचा दिलासा! चुंबन प्रकरणी शिल्पा शेट्टीला जुनाच आदेश कायम 

न्यायालयाचा दिलासा! चुंबन प्रकरणी शिल्पा शेट्टीला जुनाच आदेश कायम 

Richard Gere Kissing case: अभिनेता रिचर्ड गेरे याने 2007 मध्ये राजस्थानमधील एका प्रमोशनल कार्यक्रमात सार्वजनिकरित्या चुंबन घेतल्याप्रकरणी (Richard Gere Kissing case) दाखल करण्यात आलेल्या अश्लीलतेच्या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty) दोषमुक्त करण्याचा दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने आज कायम ठेवला. (Richard Gere Kissing Incident) दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्धचा फेरविचार अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. जाधव यांनी फेटाळून लावला.

एड्स जनजागृतीसाठी २००७ मध्ये राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रामात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेअर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान गेअर याने शिल्पाचे सर्वांसमोर चुंबन घेतले होते. या प्रकारावरून मोठा वाद झाला होता. आपल्यासाठीही गेअर याची कृती अनपेक्षित असल्याचे स्पष्टीकरण शिल्पा हिने दिले होते.

दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमात अश्लील आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टीवर जयपूर, अलवर आणि गाझियाबाद येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजस्थान न्यायालयाने शिल्पा आणि गेअरविरोधात अटक वॉरंट देखील काढले होते. यानंतर हे प्रकरण राजस्थान न्यायालयाकडून मुंबई दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. विस्तृत सुनावणीनंतर जानेवारी २०२२ मध्ये शिल्पा हिला एका प्रकरणात न्यायालयाने दोषमुक्त केले होते.

Parineeti Chopra Raghav Chadha या आठवड्यात करणार साखरपुडा? दिल्लीत तयारी झाली सुरू

या प्रकरणाची चित्रफित पाहिल्यास गेअर याच्या कृतीची शिल्पा हीच पीडित असल्याचे दिसून येते, असे निरीक्षण तिला प्रकरणातून दोषमुक्त करताना न्यायालयाने नोंदवले होते. तसेच गेअर याने तिचे चुंबन घेतले, त्यावेळी शिल्पा हिने त्याचा प्रतिकार केला नाही. यामुळे तिला गुन्हेगार ठरवता येणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले होते. दंडाधिकाऱयांच्या या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

दंडाधिकाऱयांनी शिल्पा शेट्टीला दोषमुक्त ठरवण्यात चूक केली. तिला दोषमुक्त ठरवण्याचा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या तत्वाविरोधात असल्याचे सांगितले. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी फेरविचार अर्जाद्वारे करण्यात आली. मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. जाधव यांनी हा फेरविचार अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान, दंडाधिकाऱयांनी दुसऱ्या प्रकरणात सुनावणी सुरू असल्याने शिल्पा हिला दिलासा देण्यास नकार दिला होता. या आदेशाला शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने तिच्याविरोधात गुन्हा रद्द केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube