Download App

प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय, ते निषेधार्ह; सचिन गोस्वामी

  • Written By: Last Updated:

Sachin Goswami Reaction On Prajkta Mali Allegation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं (Prajkta Mali) नाव घेतलंय. त्यामुळे या हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय. सिनेसृष्टीमध्ये देखील आमदार धस यांच्या वक्तव्यामुळं मोठं संतापाचं वातावरण आहे. याप्रकरणी आता महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

‘करुणाताई तुम्ही असं करणार नाही…’,प्राजक्ता माळीचं भावनिक आवाहन

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी याप्रकरणी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये गोस्वामी यांनी म्हटलंय की, ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो, तो समाज सभ्य समजला जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे. क्लेषदायक आहे. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या.

आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात घेतल्यामुळे सचिन गोस्वामी यांनी निषेध व्यक्त केलाय. हे अत्यंत क्लेषदायक असल्याचं देखील गोस्वामी यांनी म्हटलंय. याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी प्राजक्ताने सुरेश धस यांच्या दाव्यांचा निषेध नोंदवला. त्याचप्रमाणे आमदार धस यांनी माफी मागावी असं देखील म्हटलंय. सुरेश धस यांच्या वक्तव्यामुळे खूप मनस्ताप सहन करावा, असा आरोप देखील प्राजक्ताने पत्रकार परिषदेत केलाय.

मंत्री हसन मुश्रीफ यांचं धनंजय मुंडेंबाबत मोठं विधान; म्हणाले, …तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकता

आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले होते?
परळी राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झालंय. परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदेशीर ताबा आहे. या धंद्यांच्या जोरावर प्रचंड पैसा मिळवला जात आणि त्यातूनच इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातंय. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथं आणलं जातंय. जर कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावं. याचा प्रसार देशभरात करावा, असं आमदार सुरेश धस म्हणाले होते.

 

follow us