Download App

Maidaan : आता घरबसल्या पाहा अजय देवगणचा ‘मैदान’! कधी, कुठे, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर

Maidaan OTT Release Date and Time: अजय देवगणचे (Ajay Devgan) दोन चित्रपट या वर्षात आतापर्यंत थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत.

Maidaan OTT Release Date and Time: अजय देवगणचे (Ajay Devgan) दोन चित्रपट या वर्षात आतापर्यंत थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. अभिनेत्याचा सुपरनॅचरल थ्रिलर ‘शैतान’ मार्च महिन्यात प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) जबरदस्त कमाई केली आणि प्रचंड कलेक्शन केले. ‘शैतान’ ब्लॉकबस्टर ठरला होता. यानंतर अजय देवगणचा स्पोर्ट्स ड्रामा बायोपिक ‘मैदान’ (Maidaan) एप्रिलमध्ये थिएटरमध्ये दाखल झाला. त्याची टक्कर अक्षय कुमार-टायगर श्रॉफ स्टारर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’सोबत झाली.

दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. पण ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या तुलनेत ‘मैदान’ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा आणि अजय देवगणच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले. ज्यांनी चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘मैदान’ आता ओटीटीवर खळबळ माजवण्यासाठी येत आहे. हा चित्रपट कोणत्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार आहे. चला तर मग जाणून घ्या…


ओटीटीवर ‘मैदान’ कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?

‘मैदान’चे डिजिटल अधिकार ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने विकत घेतले आहेत. आता, ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, अजय देवगणचा हा चित्रपट पुढील महिन्यापासून म्हणजेच 7 जूनपासून ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. मात्र, ‘मैदान’च्या ओटीटी रिलीजबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Box Office: ‘भैय्या जी’च्या कमाईत मोठी घट; जाणून घ्या मनोज वाजपेयींच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन

अमित रविंदरनाथ शर्मा यांनी सह-लिखित आणि दिग्दर्शित केलेला मैदान हा चित्रपट 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपट होता. आकाश चावला, अरुणव जॉय सेनगुप्ता, बोनी कपूर आणि झी स्टुडिओज निर्मित मैदान, 1952 ते 1962 या काळात भारतीय फुटबॉलमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे क्रांतिकारी फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. यात अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली आहे. प्रियामणी, गजराज राव, नितांशी गोयल, रुद्रनील घोष यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ईदच्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता आणि अली अब्बास जफरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’सोबत टक्कर झाली होती.

follow us