Box Office: ‘भैय्या जी ’च्या कमाईत मोठी घट; जाणून घ्या मनोज बाजपेयीच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन

Box Office: ‘भैय्या जी ’च्या कमाईत मोठी घट; जाणून घ्या मनोज बाजपेयीच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन

Bhaiya Ji Box Office Collection Day 5: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) अनेक वर्षांपासून ओटीटीवरील (OTT) त्याच्या सिरिजने मोठी खळबळ माजवत आहेत. खुप काळानंतर मनोजचा ॲक्शन मसाला असलेला ‘भैय्या जी’ (Bhaiya Ji Movie) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मनोजचा हा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत होता. पहिला म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील हा 100 वा चित्रपट आहे आणि दुसरे म्हणजे या चित्रपटाची निर्मिती मनोजची पत्नी शबाना रझा यांनी केली आहे. बरीच चर्चा होऊनही,’भैय्या जी’ने बॉक्स ऑफिसवर कोणतीही ताकद दाखवली नाही आणि यामुळे चित्रपट कमाईच्या बाबतीत मागे पडला. ‘भैय्या जी’ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी किती कलेक्शन केले आहे चला तर मग जाणून घेऊया?

 

View this post on Instagram

 

A post shared by RJ Divya (दिव्य) Solgama (@divyasolgama)


‘भैय्या जी’ ने रिलीजच्या 5 व्या दिवशी किती कमाई केली?

मनोज बाजपेयी स्टारर ‘भैय्या जी’च्या ट्रेलरने खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर झाले. मात्र, थिएटरमध्ये धडकल्यानंतर ‘भैय्या जी’ला प्रेक्षकांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि त्यानंतर ‘भैय्या जी’ तिकीट काउंटरवर आपली पकड मजबूत करू शकला नाही.’भैय्या जी’ रिलीज होऊन 5 दिवस झाले आहेत आणि मूठभर कलेक्शन करण्यासाठी तो खूप धडपडत आहे.

‘भैय्या जी’च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 1.35 कोटींचे खाते उघडले आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 1.74 कोटींचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी ‘भैय्या जी’ची कमाई 1.85 कोटी रुपये होती. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 90 लाखांची कमाई केली. आता ‘भैय्या जी’च्या रिलीजच्या पाचव्या दिवसाच्या म्हणजेच पहिल्या मंगळवारी कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘भैया जी’ ने रिलीजच्या 5 व्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी 85 लाखांची कमाई केली आहे. यासह ‘भैय्या जी’चे 5 दिवसांचे एकूण कलेक्शन आता 6.7 कोटी रुपये झाले आहे.

‘भैय्या जी’ रिलीजच्या 5 दिवसांत 10 कोटींचीही कमाई करू शकला नाही

‘भैय्या जी’ बॉक्स ऑफिसवर कासवाच्या वेगाने पुढे जात आहे. आठवड्याच्या दिवसांत या चित्रपटाची कमाई लाखांवर आली आहे. रिलीजच्या 5 दिवसांत तो 10 कोटी रुपयेही गोळा करू शकला नाही. 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘भैय्या जी’च्या कमाईचा वेग लक्षात घेता, त्याचे बजेट वसूल करणे कठीण वाटते. या सगळ्यात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’ही या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. राजकुमार रावच्या या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. अशा परिस्थितीत मिस्टर अँड मिसेस माही रिलीज झाल्यानंतर ‘भैय्या जी’ बॉक्स ऑफिसवर गमवू शकतो.

36 Day: अमृता खानविलकरचं नशीब फळफळलं! एक नव्हे बॉलिवूडच्या आणखी एका चित्रपटात झळकणार

काय आहे ‘भैय्या जी’ची कथा?

‘भैय्या जी’ हा रिव्हेंज ड्रामा चित्रपट आहे. मनोज बाजपेयी चित्रपटात रामचरण त्रिपाठीची भूमिका साकारत आहे, ज्याच्या भावाची हत्या झाली आहे. यानंतर, आपल्या लहान भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी, रामचरण त्रिपाठी ‘भैय्या जी’ बनतो आणि शस्त्र हाती घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज