Malaika Arora: मलायकानं अर्जुनसोबतच ‘तो’ फोटो केला शेअर; म्हणाली, ‘लेजी बॉय…’

Malaika Arora Shared Photo: बॉलिवूडची मुनी अशी ओळख असलेली मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या फॅशनमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. मलायका ही सध्या अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेकवेळा चाहत्यांनी त्यांना ट्रोल करत असतात. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबत कायम रोमँटिक […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 29T120708.915

Malaika Arora

Malaika Arora Shared Photo: बॉलिवूडची मुनी अशी ओळख असलेली मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या फॅशनमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. मलायका ही सध्या अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेकवेळा चाहत्यांनी त्यांना ट्रोल करत असतात. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबत कायम रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे दिसून येत असतात.


नुकताच मलायकानं अर्जुनचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने अनेक चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. मलायकाने अर्जुनचा हाफ नेकेड ब्लँक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिले आहे की, ‘माय वेरी ओन लेजी बॉय.’ मलायकाचा हा फोटो अर्जुननं रिपोस्ट केला आहे. मलायकाने अर्जुनचा हाफ नेकेड फोटो शेअर केल्याने सध्या हे कपल जोरदार चर्चेत येत आहे.

मलायकाने 1998 मध्ये अरबाजबरोबर लग्न केले आहे. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला होता. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मलायका आणि अर्जुन हे दोघे एकमेकांबरोबरचे सतत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मलायका ही 49 वयाची आहे तर अर्जुन 37 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.


वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला खूपवेळा सोशल मीडियावर ट्रोल होत असल्याचे दिसून येत असते. ‘इश्कजादे’ या सिनेमामधून अर्जुनने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या सिनेमानं चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. अर्जुनच्या आगामी सिनेमांची त्याचे चाहते मोठे उत्सुकतेने वाट पाहत असतात.

राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले

मलायकाला ‘छैय्या छैय्या’ आणि मुनी बदनाम हुई’ या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली होती. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते. तसेच ती सोशल मीडियावर तिच्या अनेक लूकमधील फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिला 17.6 मिलियन फॉलोवर्स आहे. मलायका गेल्या काही दिवसाअगोदर तिच्या डब्बू रत्नानीने केलेल्या फोटोशूटच्या बीटीएसचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.

Exit mobile version