राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले

राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले

Raghav Chadha-Parineeti Chopra will get married in Udaipur! The couple left to finalize the wedding destination : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा (MP Raghav Chadha) यांचा 13 मे रोजी दिल्लीत साखरपुडा झाला. दोघांच्या एंगेजमेंटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साखरपुडा सोहळ्यानंतर आता राघव आणि परिणीती काही महिन्यांतच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याने त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी ठिकाण शोधण्यास सुरुवात केली आहे.

परिणीती आणि राघव राजस्थानमध्ये
साखरपुड्यापूर्वी, परिणीती आणि राघवच्या नात्याची चर्चा अनेक महिन्यांपासून बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळात होत होती.. मात्र या दोघांनी किंवा चोप्रा, चड्ढा कुटुंबीयांनी या नात्यावर मौन बाळगले होते. मात्र, परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांचा साखरपुडा अलीकडेच पार पडला. राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे एकमेकांना खूप काळापासून ओळखतात. दोघेही कॉलेज मित्र असल्याचे सांगितले जाते. तथापि, तेव्हा ते फक्त मित्र होते आणि आता ते पती-पत्नी बनणार आहेत. नुकताच परिणीती चोप्राचा एक व्हिडिओ समोर आला असून तो उदयपूरचा असल्याचा दावा केला जात आहे.

परिणीती उदयपूरच्या हॉटेल लीला पॅलेसमध्ये आणि तिचे कुटुंबीय उदयविलास पॅलेसमध्ये थांबले आहे. परिणीतीसोबत राघवही स्पॉट झाला होता. दोघांना एकत्र पाहून हे कपल लग्नाचे डेस्टिनेशन फायनल करण्यासाठी उदयपूरला पोहोचले असल्याचे बोलले जात आहे. ते राजस्थानमध्ये लग्नाचे ठिकाण फायनल करत आहेत. त्यांचा विवाह राजस्थानमधील एका आलिशान महालात होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याचे अधिकृत अपडेट समोर आलेले नाही.

या वर्षी लग्न करणार!

परिणीती आणि राघवच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण याच वर्षी ते लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. राघव आणि परिणीती ऑक्टोबरमध्ये सात फेरे घेऊ शकतात. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या साखरपुडामध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त जवळचे नातेवाईक सहभागी झाले होते. एंगेजमेंट साध्या पद्धतीने केली असती तरी लग्न मोठ्या धूमधडाक्यात होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी परिणीतीची बहीण प्रियांका चोप्राचे शाही लग्न जोधपूरमध्ये पार पडले होते. यानंतर आता परिणीती राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याचं बोललं जातंय. पण परिणीती, राघव किंवा त्यांच्या कुटुंबीयांनीही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube