Harish Pengan : मल्याळम अभिनेते हरीश पेंगन यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन

Harish Pengan Death : मल्याळम अभिनेते हरीश पेंगन यांचे मंगळवारी निधन झाले. (Harish Pengan ) अभिनेत्याने वयाच्या 49 व्या वर्षी कोची येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Harish Pengan Death ) त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.   View this post on Instagram   A post shared by Tovino⚡️Thomas (@tovinothomas) हरीश […]

Letsupp Image (5)

Harish Pengan

Harish Pengan Death : मल्याळम अभिनेते हरीश पेंगन यांचे मंगळवारी निधन झाले. (Harish Pengan ) अभिनेत्याने वयाच्या 49 व्या वर्षी कोची येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Harish Pengan Death ) त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.


हरीश पेंगन गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत होते. रुग्णालयात (hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. यकृताच्या समस्येशिवाय त्यांना आणखी काही गंभीर समस्या होत्या. हरीश पेंगन यांना मे महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. सतत प्रकृती गंभीर असल्याने यकृत ट्रान्सफर करणं गरजेचं होतं. पण यासाठी त्यांना 30 लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्यांच्या बहिणीने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली होती. पण त्याची प्रकृती खालावली आणि उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. हरीश पेंगन यांच्या निधनानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील शोक व्यक्त करत आहेत.

Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल कोल्हेंकडून समाचार

हरीश पेंगन हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी महेशिनते प्रथिकारम, हनी बी 2.5, जानेमन, जया जया जया जया हे आणि मिन्नल मुरलीसारख्या सिनेमामध्ये चांगले काम केलं आहे. ‘महेशिंते प्रथिकारम’ आणि ‘शेफीकिन्ते संतोषम’ हे त्यांचे सिनेमे खूपच गाजले होते.

Exit mobile version