Sowmya Accused Director For Rape: हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत (Malayalam Film Industry) पुन्हा एकदा Me Too चळवळ सक्रिय झाली आहे. इतर दक्षिणेकडील राज्यांतील अभिनेत्रीही त्यांना झालेल्या छळाबाबत खुलासे करत आहेत. अलीकडेच अभिनेत्री सौम्याने (Sowmya ) देखील सांगितले की एका तमिळ दिग्दर्शकाने (Tamil Director) तिच्यावर कसा बलात्कार केला आणि हे सर्व तिच्यासोबत वर्षभर घडत राहिले.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सौम्या म्हणाली की, ‘मी 18 वर्षांची होते आणि कॉलेजच्या पहिल्या वर्षात होते… मी खूप सुरक्षित पार्श्वभूमीतून आले आहे आणि माझ्या पालकांना चित्रपटांबद्दल काहीही माहिती नव्हते. एका तामिळ चित्रपटात काम करण्याची संधी माझ्या कॉलेजच्या थिएटर कॉन्टॅक्ट्समुळे मिळाली.
‘या’ अभिनेत्रीला दिग्दर्शकाची पसंती नव्हती
सौम्या पुढे म्हणाली, ‘मी लहान होते, त्यामुळेच त्यावेळी माझ्या घराजवळ राहणाऱ्या अभिनेत्री रेवतीकडे मी आकर्षित झाले होते. मी काल्पनिक जगात होते, म्हणून मी या जोडप्यासोबत स्क्रीन टेस्टसाठी गेले होते. अभिनेत्रीने सांगितले की, दिग्दर्शकाने तिच्या वडिलांना सांगितले होते की तिने तिच्या स्क्रीन टेस्टसाठी खूप पैसे खर्च केले आहेत. सौम्याने सांगितले होते की, ती त्या व्यक्तीसोबत कम्फर्टेबल नाही. पण तिला तो चित्रपट करणं भाग पडलं.
‘मी त्याच्या नियंत्रणाखाली होते आणि…’
अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘पहिल्या आऊटडोअर शूटच्या वेळी तो माझ्याशी बोलला नाही. त्यांची पत्नीच दिग्दर्शक असेल असा करार होता, पण तो केवळ कागदावरच होता. खरंतर तो संपूर्ण चित्रपट दिग्दर्शित करत होता आणि म्हणून मी त्याच्या ताब्यात होते आणि तो माझ्याशी शांतपणे वागत होता जसे अनेक पुरुषांना करण्याची सवय आहे. सौम्या पुढे म्हणाली की, दिग्दर्शकाचे तिच्याबद्दलचे वागणे नंतर बदलले.
‘मला त्याची मुलगी म्हणत असताना त्याने माझे…’
सौम्या पुढे म्हणाली की, ‘मी किशोरवयीन असताना घरात बंडखोर होते आणि अचानक हे जोडपे माझ्याशी चांगले वागू लागले, चांगले जेवण देऊ लागले. ती एक ग्रूमिंग प्रक्रिया होती. तो काय करतोय हे त्याला चांगलंच माहीत होतं. एके दिवशी, त्याची पत्नी आजूबाजूला नसताना, या माणसाने माझे चुंबन घेतले, मला त्याची मुलगी असल्यासारखी वागणूक देत असत. मी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. मी माझ्या मित्रांना सांगायचं खूप प्रयत्न केला होता.
दिग्दर्शकाने अभिनेत्रीवर वर्षभर बलात्कार केला
अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘मी काहीतरी चुकीचे केले आहे या विचाराने मला लाज वाटत होती आणि मी या माणसासोबत चांगले वागले. त्यामुळे मी सरावासाठी, डान्स रिहर्सलसाठी जात होते. दररोज तो माणूस माझ्या शरीराचा पूर्णपणे उपयोग करत असत. त्यामुळे मी कॉलेजमध्ये असताना त्याने माझ्यावर बलात्कार केला आणि हा प्रकार जवळपास एक वर्ष चालू राहिला.
Kangana Ranaut: थप्पड प्रकरणानंतर अभिनेत्रीने थेटच सांगितलं; म्हणाली, ‘हे बलात्कार आणि हत्येपेक्षा…’
‘तो मला त्याची ‘मुलगी’ म्हणायचा आणि त्याला माझ्याकडून मूल हवे होते’
सौम्या पुढे म्हणाली की, ‘तो मला वारंवार त्याची ‘मुलगी’ म्हणत होता आणि माझ्यापासून त्याला फक्त मूल हवे होते.’ अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, दिग्दर्शक तिच्या मनाशी खेळला. ‘लज्जेच्या या भावनेवर मात करायला मला 30 वर्षे लागली. यावेळी सौम्याने आरोपी दिग्दर्शकाची ओळख उघड केली नाही, ती केरळ सरकारने स्थापन केलेल्या विशेष पोलिस पथकाला त्याची ओळख सांगणार असल्याचे सांगितले आहे.