हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी अन् गँगस्टरशी भेट, अभिनेत्री प्रयागा मार्टिन पुन्हा चर्चेत

हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी अन् गँगस्टरशी भेट, अभिनेत्री प्रयागा मार्टिन पुन्हा चर्चेत

Prayaga Martin : गेल्या काही दिवसांपासून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Malayalam film industry) अनेक धक्कादायक खुलासे होत असल्याने सोशल मीडियावर मल्याळम फिल्म इंडस्ट्री चर्चेत आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांवर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहे. तर आता मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्ज प्रकरण समोर आला आहे. ड्रग्ज प्रकरणामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय 29 वर्षीय अभिनेत्री प्रयागा मार्टिनचे (Prayaga Martin) नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या गँगस्टर ओमप्रकाशसोबत अभिनेत्री प्रयागा मार्टिन गँगस्टर स्पॉट झाली होती. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात प्रयागा मार्टिनशी देखील चौकशी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोचीमधील एका हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. छाप्यादरम्यान पोलिसांनी ओमप्रकाश आणि त्याचा सहकारी शिहासला अटक केली होती.

या प्रकरणात चौकशी करताना अभिनेत्री प्रयागा मार्टिनही हॉटेलच्या रूममध्ये गँगस्टर ओमप्रकाशला भेटायला गेली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावरून पोलीस अभिनेत्री प्रयागा मार्टिनची चौकशी करणार आहे.

प्रकरण काय?

रविवारी पोलिसांना कोचीमधील एका हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि गँगस्टर ओमप्रकाशसोबत त्याचा सहकारी शिहासला अटक केली मात्र पुरेशा पुराव्यांअभावी एर्नाकुलमच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी दोघांनाही जामीन मंजूर केला. तर दुसरीकडे रिमांड अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालात श्रीनाथ भासी आणि प्रयागा मार्टिन हे ओमप्रकाश यांच्या हॉटेलच्या रूममध्ये गेले होते. याच बरोबर श्रीनाथ भासी आणि प्रयागा मार्टिन यांच्या व्यतिरिक्त आणखी 20 जण ओमप्रकाशच्या रूममध्ये गेले होते अशी माहिती रिमांड अहवालात देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास मराड पोलिस करत असून प्रकाश आणि शिया यांच्यासोबत हॉटेलमध्ये असलेल्या लोकांना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे.

साताऱ्यात अजित पवारांचे शक्तिप्रदर्शन, विरोधकांचा घेतला समाचार

कोण आहे अभिनेत्री प्रयागा मार्टिन

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रयागा मार्टिनची ओळख आहे. ती गेल्या 12 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. तिने 2012 मध्ये उस्ताद हॉटेलमधून फिल्मी दुनियेत प्रवेश होता. त्यानंतर प्रयागा मार्टिनने पिसासू, ओरु मुराई वंथु पार्थया, पा वा, ओरे मुख, फुकरी, रामलीला, उल्टा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube