मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णी झळकणार मल्याळममध्ये, ‘या’ चित्रपटामधून करणार पदार्पण

मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णी झळकणार मल्याळममध्ये, ‘या’ चित्रपटामधून करणार पदार्पण

Sonali Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni). मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ (Malaikottai Valiban) या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत (Malayalam film) पदार्पण करत आहे.

यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला असून या फ्युजन लावणीत सोनालीची बहारदार अदा पाहायला मिळत आहे. आपल्या मनमोहक नृत्यदाकारीने सोनाली दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ करणार असून महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य आता सोनाली दक्षिणात्य चित्रपटात गाजवणार आहे.

Article 370 Song Dua : यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटातलं पहिलं गाणं ‘दुआ’ रिलीज…

या चित्रपटाबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, ” हा माझा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, खूप आनंदाची गोष्ट आहे. आज या गाण्याच्या माध्यमातून माझ्या लूकवरील पडदा अखेर उठला आहे. जगभरात प्रदर्शित होणारा हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड मध्ये २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या पुढील आठवड्यात हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Malini Agrawal : ब्लॉगपासून रील्सपर्यंत मालिनी अग्रवाल ठरतेय द ओजी इन्फ्लुन्सर

हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे. माझ्यासाठी हा एक खास अनुभव आहे. प्रेक्षक मला या नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारतील, याची खात्री आहे.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube