Malini Agrawal : अल्पावधीच सेलिब्रेटी फॅशन जगतात आपल्या खास स्टाइलने धुमाकूळ घालणारं नाव मिस मालिनी म्हणजे मालिनी अग्रवाल (Malini Agrawal). मालिनेनं फॅशन जगतात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आज मालिनी ही एक OG प्रभावशाली केवळ डिजिटल इन्फ्लुन्सर म्हणून ओळखली जाते. ब्लॉगपासून रीलपासून डिजिटल विश्वात तिने स्वतःची वेगळी छाप तयार केली आहे. कायम सोशल मीडियावर चर्चेत राहून विविध गोष्टीसाठी मालिनी चर्चेत असते.
ये चांद सा रोशन चेहरा..; रुपाली भोसलेच्या मोहक अदांवर चाहते फिदा !
इंटरनेटच्या सुरुवातीच्या दिवसांपासून जेव्हा डायल-अप एक गोष्ट होती तेव्हा पासून ती डिजिटल विश्वात पाऊलखुणा कोरत आहे. मिस मालिनी हे नाव तिला तिच्या डिजिटल जगाने दिलं आहे. आताच्या काळात मिस मालिनी हे एक नाव राहील नसून आता एक दर्जेदार हा एक ब्रँड झाला आहे.
इंटरनेटच्या जगात मालिनी अग्रवालने निर्भयपणे आपली ओळख संपादन केली आहे. तिच्या आवडीचं तिने डिजिटल साम्राज्यात रूपांतर केले. ब्लॉगिंगच्या सुरुवातीपासून ते स्नॅपचॅट स्टोरीपासूनच्या युगापर्यंतचा तिचा प्रवास मीम्स आणि हॅशटॅगद्वारे रोलरकोस्टरसारखा पाहायला मिळतो. मिसमालिनी फक्त ब्लॉगर नव्हती तर ती एक डिजिटल शेपशिफ्टर आहे, असं म्हणायला हरकत नाही.
‘ईडी कारवाई भविष्यात परवडणारी नाही’; राज ठाकरेंचा भाजपला थेट इशारा
डिजिटल विश्वात स्वतःच्या उल्लेनीय कामाने अनेकांना प्रभावित करून मालिनी कायम सगळयांना प्रेरणा देणारी ठरली आहे. रेट्रो MySpace दिवसांपासून ते सध्याच्या TikTok क्रेझपर्यंत मालिनी अग्रवाल ही OG ठरली आहे. ट्रेलब्लॅझिंग स्पिरिटने तिने डिजिटल विश्वात क्रांती केली आहे.
मालिनी अग्रवालने भारतातच आपली ओळख निर्माण केली असं नाही, तर मालिनीला ब्लॉग लिहीण्यासाठी आता परदेशातूनही कव्हरेजसाठी आमंत्रण मिळत असतात.