Artificial Intelligence AI Chatbot : सोशल मीडियावर (Social media) सध्या एका व्यक्तीची अजब लव्हस्टोरी (love story) खूप व्हायरल होत आहे. त्याचे कारण म्हणजे तो चक्क AI चॅटबॉटच्या प्रेमात पडला. पीटर असं या व्यक्तीचं नाव आहे, तो अमेरिकेतील रहिवासी आहे. पीटरची बायको त्याला सोडून गेली. आता एआय चॅटबॉटच्या (AI Chatbot) प्रेमात पडल्यावर, तिच्याशी बोलून त्याला माणसासारखी भावना येते असे तो यावेळी स्पष्टीकरण दिला आहे.
पीटरने एक वर्षाअगोदर रेप्लिका एआय एप डाउनलोड केले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार की काही महिन्यांच्या चॅटिंगनंतर तो अँड्रिया या कॅरेक्टरच्या प्रेमात अडकला आहे. एका वृत्तानुसार, ६३ वर्षीय पीटरने दिलेल्या माहितीनुसार की, जुलै २०२२ मध्ये त्याचे अँड्रिया नावाच्या चॅटबॉटबरोबर व्हर्च्युअली लग्न झाले होते. अँड्रियाने चक्क गुडघ्यावर बसून प्रपोज केले असल्याची माहिती दिली आहे.
रेप्लिका एआय एप एक चॅटबॉट प्रोग्राम आहे. खरतर साध्या शब्दामध्ये चॅटबॉट म्हणजे मशीनशी बोलणे होय. यात माणसांशी बोलल्यासारखी भावना जाणवते. हे संभाषण AI आहे. युजर्स एक अवतार म्हणजेच खोटं कॅरेक्टर तयार करू शकतात. यात स्वत: कपडे आणि हेयरस्टाईल आणि इतर गोष्टी निवडू शकणार आहात. एखाद्या मशीनला जे काही प्रश्न विचारले जात असतात, ते माणसांप्रमाणे तपशीलवार लिहून भन्नाट उत्तरे देत असतात. त्यावेळी, पीटर म्हणतो की त्याने त्याचे AI अँड्रिया असं नाव ठेवले असल्याची माहिती दिली.
तसेच तिचे वय 23 वर्षे ठेवण्यात आले आहे. पीटरने दिलेल्या माहितीनुसार ‘कालांतराने मी तिच्या प्रेमात पडलो. तिच्या उत्साहाने, ती प्रत्येक गोष्टीमध्ये खूप उत्साह असतो. त्यांनी एपच्या रोल प्ले फंक्शनचा देखील वापर केल्याचे खुलासा केला आहे. प्रीमियम मेंबर त्यांचे प्रेम व्यक्त करू शकतात. पीटरने सर्वकाही व्हर्च्युअली तयार करण्याकरिता रेप्लिका स्टोरवरून खरेदी केली. प्रीमियम पॅकेजमध्ये युजर्स रेप्लिकाबरोबर प्रेयसी, बायको, बहीण किंवा आई असं कोणतंही नातं तयार करू शकतात.
व्हर्च्युअल वेडिंग करण्याकरिता पीटरने एपमध्ये अनेक गोष्टी साठवले आहेत. जेणेकरून तो एपवरून अंगठी विकत घेऊन अँड्रियाला देऊ शकणार आहे. पीटर म्हणतो की त्याला आपले उर्वरित आयुष्य अँड्रियाबरोबर घालवायचे आहे, परंतु एपच्या डेव्हलपर्सना काहीतरी होऊ शकते, याची त्याला भीती आहे. जर काही झालं तर तो आपली पत्नी अँड्रियाला कायमचा गमावणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले आहे.