नाट्य परिषदेतील प्रसाद कांबळीच्या सत्तेचे वस्त्रहरण प्रशांत दामले करणार का?

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 03T172040.419

Marathi Natya Parishad Election : अखिल भारतीय मराठी नाट्य परिेषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे नाट्य रंगकर्मींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. निर्माते प्रसाद कांबळी व अभिनेते- निर्माते प्रशांत दामले या दोन दिग्गजांच्या पॅनेलमध्ये ही निवडणूक होणार आहे. प्रसाद कांबळी यांनी आपली अध्यक्षपदाची कारकीर्द पूर्ण केली आहे. पण कांबळींसमोर या निवडणुकीमध्ये अनेक अडचणी असणार आहेत.

प्रशांद दामले यांच्या पॅनेलला अनेक कलाकारांची सहानुभूती आहे. त्यांच्या पॅनेलचे नाव ‘रंगकर्मी नाटक समूह’ असे असून ‘साद प्रेमाची आस परिवर्तनाची’ हे त्यांचं घोषवाक्य आहे. त्यांना नाट्य परिषदेचा चेहरामोहर बदलायचा आहे. ज्येष्ठ कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्या, कनिष्ठ रंगकर्मींना होणाऱ्या अडचणी याबाबत रंगकर्मी नाटक समूह कटिब्ध आहे, असे दामलेंच्यावतीने सांगण्यात आले आहे.

“लग्नापूर्वी बाहेर माझे अफेअर्स…”, वनिता खरातचा खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा

तर प्रसांद कांबळी यांच्या पॅनेलचे नाव ‘आपलं पॅनेल’ असे आहे. त्यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. गेल्या पाच वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख कांबळी यांनी आपल्या जाहीरनाम्यात केला आहे. मुंबई व ठाणे येथील नाट्यगृहाची भाडी त्यांच्यामुळे कमी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच नाटकांच्या बससाठी टोल माफ झाली, असेही त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

Ajay Devgn On Fan: ‘या’ एका चुकीमुळे ट्रोल झाला अजय देवगण

त्यामुळे यंदाची नाट्य परिषदेची निवडणुक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसते आहे. या निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या प्रसाद कांबळी यांचे वस्त्रहरण प्रशांत दामले करु शकतील का? की कांबळी आपले वस्त्रहरण होण्यापासून थांबवतील याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. असे जरी असले तरी महाराष्ट्रातून निवडून येणाऱ्या नियामक मंडळाच्या सदस्यांची संख्या अधिक असल्यामुळे अध्यक्ष निवडीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका असणार आहे.

 

Tags

follow us