Download App

Manachi Writers Association: मानाचि लेखक संघटनेचे सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन

Manachi Writers Association: मानाचि लेखक संघटना गेल्या अनेक वर्ष लेखकांच्या हिताचं काम करत आहे. (Manachi Writers Association) लेखकांच्या हक्कासाठी प्रयत्न करणाऱ्या या संघटनेने आता त्यांच्या अनेक मागण्यांसाठी सांस्कृतिक मंत्र्याची भेट घेतली आहे. सिरीयल, नाटक, सिनेमा लेखक संघटनेच्या राजेश देशपांडे, श्रीकांत बोजेवार, श्याम पेठकर, राहुल वैद्य व विवेक आपटे या प्रतिनिधींच्या मंडळाने माननीय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची दिनांक 21 ऑक्टोबर 2023 दिवशी भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

1. लेखकाला आपल्या नाटकाचे किंवा सिनेमाचे शीर्षक स्वतःच्या नावाने रजिस्टर करता यावे.

2. कविता गीते व संवादातील विशिष्ट शब्दरचना सिरीयलचे शीर्षक म्हणून वापरली गेली तर मूळ लेखकाला त्याचे उचित श्रेय व वन टाइम पेमेंट स्वरूपात मानधन मिळावे.

3. सिनेमाच्या दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि मुख्य कलाकारांप्रमाणेच लेखकाचेही, ना हरकत प्रमाणपत्र (NOC) असल्याशिवाय या सिनेमाला सेन्सॉर सर्टिफिकेट दिले जाऊ नये, या अस्तित्वात असलेल्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.

4. कॉपीराईट रजिस्ट्रेशन दिल्लीप्रमाणेच मुंबईत देखील व्हावे.

5. वृद्ध व विकलांग लेखकांसाठी पेन्शन योजना असावी.

6. मानाचि लेखक संघटनेला त्यांच्या कार्यालयासाठी व त्यांचे विविध उपक्रम राबवण्यासाठी सरकारी आस्थापनात जागा मिळावी.

Songya Movie: स्त्री संघर्षाचा वेध घेणारा ‘सोंग्या’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार भेटीला

या लेखकांच्या मुख्य मागण्या होत्या. या मुद्द्यांवर माननीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. माननीय मंत्र्यांनी यातील काही मुद्द्यांवर सिनेमा महामंडळ, चित्रनगरीचे संचालक आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी वरीलपैकी काही समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्ग काढावा, असे सुचवले आहे. त्याबाबत मानाचि लेखक संघटना आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us