Download App

Manipur Violence: हिंसेची धग कायम! आई-पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून प्रसिद्ध गायकाचं अपहरण

Manipur Singer Kidnap: मणिपूरमध्ये गेल्या काही काळापासून सतत हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहे. (Manipur Violence) महिलांच्या शोषणाचा मुद्दाही इथे सध्या गाजत आहे. या ठिकाणी मैतेई आणि कुकी या दोन समुदायाच्या वादाने क्रूर आणि हिंसक वळण मिळालं आहे, अशा परिस्थितीत आता स्थानिक प्रसिद्ध गायकाचे अपहरण झाल्याची बातमी समोर येत आहे. अखू चिंगांगबम (Akhu Chingangbam) असे या गायकाचे नाव आहे. या घटनेबाबत असे सांगितले जात आहे की, हल्लेखोर सशस्त्र होते आणि त्यांनी गायकाच्या पत्नी आणि आईवर बंदुकीचा धाक दाखवल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांनी हा धक्कादायक प्रकार घडवून आणला.

‘आज तक’च्या वृत्ताचा हवाला देत या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, 29 डिसेंबर रोजी अखू चिंगांगबमचे अपहरण करण्यात आले होते. तो पूर्व इंफाळमधील खुराई येथील रहिवासी आहे. ते इंफाळ टॉकीज नावाच्या स्थानिक बँडचे संस्थापक देखील आहेत. अखू हा केवळ गायक आणि गीतकारच नाही तर एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे आणि त्याच्या उदात्त कार्यांसाठी तो खूप लोकप्रिय आहे. शिवाय तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. तो इन्स्टाग्रामवर स्वत:शी संबंधित काही ना काही पोस्ट शेअर करत असतो.

MTV India च्या संगीतमय टीव्ही शोचा एक भाग: अखू चिंगांगबम यांच्या आयुष्याबद्दल बोललो तर त्यांचे खरे नाव रोनिड चिंगांगबम आहे. तो एमटीव्ही इंडियाच्या संगीतमय टीव्ही शो द देवरिस्टचा देखील भाग होता. शिवाय हा गायक एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा त्याच्या अपघाताच्या बातम्या मीडियामध्ये आल्या. 2016 मध्ये, जागतिक संगीत दिनी, अपघातात त्यांच्या एका कानाला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांची श्रवणशक्ती कमी झाली होती.

विजयकांतच्या अंत्यदर्शन घ्यायला गेलेल्या थलपथी विजयला चाहत्याने भिरकावली चप्पल

मणिपूरमध्ये हिंसाचार: मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. राज्यात दररोज कोणत्या ना कोणत्या घटना घडत आहेत. तेथे मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहे. कुकी समाजाप्रमाणे मणिपूर राज्यातही एसटीचा दर्जा मिळावा, अशी मेईती समाजाची इच्छा आहे. आता या प्रकरणाचा वाद चांगलाच पेटला आहे. मेईतेईच्या या मागणीनंतर कुकी समाज त्याच्यावर चांगलाच संतापला असून, त्यावरून जोरदार वाद सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी तेथे महिलांच्या शोषणाचे प्रकरणही समोर आले होते, ज्याची बरीच चर्चा झाली होती आणि त्यावरून बराच वादही झाला होता.

follow us