मणिपुरात पु्न्हा हिंसाचार, कर्फ्यू लागू, शाळा अन् बाजार बंद; वादाचं कारणही धक्कादायक

मणिपुरात पु्न्हा हिंसाचार, कर्फ्यू लागू, शाळा अन् बाजार बंद; वादाचं कारणही धक्कादायक

Manipur Violence : मणिपुरात राष्ट्रपती राजवट लावल्यानंतरही हिंसाचार (Manipur Violence) थांबलेला नाही. हिंसाचाराच्या घटना घडतच आहे. आताही हिंसाचाराची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यातील चुराचांदपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी धरुण कुमार यांनी आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील दोन गावे आणि कांगवई, समुलामलान, संगाईकोट या भागात येत्या 17 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.

संघर्षाचं नेमकं कारण काय

खरंतर येथे वाद 18 मार्च रोजी झाला होता. चुराचांदपूरमध्ये जोमी आणि हमार समर्थक यांच्यात धुमश्चक्री उडाली. दोन्ही गटातील हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. काही जण जखमी झाले होते. एका व्यक्तीने मोबाइल टॉवरवर चढून जोमी झेंडा काढून जमिनीवर फेकून दिला होता. याच कारणामुळे वाद विकोपाला गेला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून ग्राम अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शांतता ठेवण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले. दोन्ही गावांत जमिनीवरुन वाद सुरू आहेत. चर्चेच्या माध्यमातून वाद सोडवला जाईल असे यावेळी सांगण्यात आले होते.

मणिपूर आणि काश्मीरमधील हिंसाचार.. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुखांचं वक्तव्य, भारताने सुनावले खडेबोल

दरम्यान, मणिपुरात फेब्रुवारी महिन्यातच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. कारण मे 2023 मध्ये कुकी आणि मैतई समाजात वाद सुरू होता. यामुळे राज्यात ठिकठिकाणी मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 250 लोक मारले गेले. दगडफेक, जाळपोळीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. हिंसा आणि तणावामुळे दोन्ही समाजाचे हजारो लोक विस्थापित झाले होते.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश आल्यानंतर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी राजीनामा दिला होता. यानंतर केंद्र सरकारने भारतीय संविधानातील अनुच्छेद 356 नुसार मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू केली. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारून राज्याची विधानसभा भंग करण्यात आली होती. आता राष्ट्रपती राजवट सुरू होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. त्यानंतर राज्यातील परिस्थिती हळूहळू सुधारत असतानाच पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे.

मोठी बातमी! मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिला राजीनामा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube