मोठी बातमी! मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिला राजीनामा

  • Written By: Published:
मोठी बातमी! मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिला राजीनामा

N Biren Singh : एक मोठी बातमी समोर आली आहे. मणिपूरचे (Manipur) मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह (N. Biren Singh) यांनी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला (Ajay Kumar Bhalla) यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंह यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीमाना राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे दिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे एन. बिरेन सिंह यांना टीकेचा सामना करावा लागत होता. याच बरोबर पक्षाचे अनेक नेते आणि आमदार देखील त्यांच्यावर नाराज होते. माहितीनुसार, भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाकडे 12 आमदारांनी नेतृत्व बदलण्यासाठी आग्रह धरला होता. तर दुसरीकडे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्यातील त्यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपमधील वाढती असंतोष शांत करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या काही आमदारांनी नेतृत्व बदलाची मागणी केल्यानंतर आणि कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने पाठिंबा काढून घेतल्यानंतर एन. बिरेन सिंह सरकारला काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव आणि बहुमत चाचणीचा सामना करावा लागू शकतो आणि जर बहुमत चाचणी झाली असती तर भाजपच्या काही आमदार पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला अशी माहिती सध्या समोर आली आहे.

अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी भेट

रविवारी सकाळी एन बिरेन सिंह यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि संभाव्य पर्यायांवर चर्चा झाली. तसेच त्यानंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला अशीही माहिती समोर आली आहे.

… तर तुमचा कार्यक्रम लावणार, मेहुण्यावर कारवाई होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जरांगेंचा इशारा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube