मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर हल्ला; एक सुरक्षा रक्षक जखमी

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर हल्ला; एक सुरक्षा रक्षक जखमी

Manipur CM Convoy Attacked : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर संशयीत कुकी बंडखोरांनी हल्ला केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचीही माहिती आहे. (Manipur) आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. (Manipur CM) मुख्यमंत्र्यांचा ताफा इंफाळहून जिरीबाम जिल्ह्यात जात असताना राष्ट्रीय महामार्ग-३७ वर हा हल्ला करण्यात आला.

सुरक्षा रक्षक जखमी  Manipur Violence : मणिपुरात सीआरपीएफ बटालियनवर हल्ला; दोन जवान शहीद

येथे 6 जून रोजी अज्ञात हल्लेखोरांनी जिरीबामध्ये एका व्यक्तीची हत्या केली होती. तेव्हापासून जिरीबाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि येथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री जिरीबाम येथे जाणार होते. मात्र, त्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग-३७ वर असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक जखमी झाला असून, त्यांच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आहे.

प्रतिबंधात्मक आदेश लागू

अतिरेक्यांनी ५९ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी जिरीबाममध्ये हिंसाचार उसळला. सोइबाम सरतकुमार सिंह असं या व्यक्तीचे नाव असून, ते ६ जून रोजी शेतात गेल्यानंतर बेपत्ता झाले होते. नंतर त्यांचा मृतदेह सापडल्याचे अधिकाऱ्याने सांगितलं. यानंतर स्थानिकांनी पडक्या इमारतींना आग लावल्यानंतर तेथे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले.

दुसऱ्या समुदायातील व्यक्तींकडून हत्या

पोलिसांच्या माहितीनुसार, कॅम्पमध्ये पाठवण्यात आलेले लोक जिरीबाम शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील रहिवासी आहेत. हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. दरम्यान, ६ जून रोजी जिरीबाम जिल्ह्यात एका समुदायातील ५९ वर्षीय व्यक्तीची दुसऱ्या समुदायातील व्यक्तींनी हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तेथे तणाव निर्माण झाला होता. हे कारण या हिंसाचारामागे असल्याचं सांगितलं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज