I Am Sorry… अखेर मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले, संपूर्ण वर्ष…

  • Written By: Published:
I Am Sorry… अखेर मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले, संपूर्ण वर्ष…

Manipur CM N Biren Singh : गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या हिंसाचाराबद्दल अखेर मणिपूरचे (Manipur) मुख्यमंत्री एन बिरेन सिंग ( CM N Biren Singh) यांनी माफी मागितली असून पुढील वर्षात राज्यात शांतता प्रस्थापित होईल अशी अशा त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात 3 मेपासून जे घडत आहे त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागतो असं त्यांनी म्हटले आहे. तसेच 2024 राज्यासाठी खूप खराब राहिला असं देखील ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, ‘मला खरोखरच खेद वाटतो. मला माफी मागायची आहे, मला आशा आहे की नवीन वर्ष 2025 मध्ये राज्यात  शांतता पूर्ववत होईल. मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरु असणाऱ्या हिंसाचारात अनेकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी देखील झाले आहे. माहितीनुसार, मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53 टक्के लोकसंख्या मेईतेई समुदायाची आहे, तर नागा आणि कुकी लोकसंख्या सुमारे 40 टक्के आहे.

मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

तर दुसरीकडे मणिपूरमधील इंफाळ पश्चिम जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. सोमवारी जिल्ह्यातील सगाईशाबी रोआ परिसरातून ही वसुली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेल्या वस्तूंमध्ये पिस्तूल, बंदुका, रायफल, एक कार्बाइन आणि हातबॉम्ब यांचा समावेश आहे. अद्याप तपास सुरू आहे.

राजकारण होणार नाही, दोषींना फासावर लटकवणार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात CM फडणवीस स्पष्टच बोलले

मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून कॉंग्रेसकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट द्यावी अशी मागणी देखील काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मात्र आता मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी माफी मागितल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार थांबणार का? हे पाहावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube