Manoj Bajpayee zoram Movie : डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बादशाह शाहरुख खानचे ‘डंकी’ आणि ‘अॅनिमल’हे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. दोन्ही सिनेमांसाठी चाहते उत्सुक आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही सिनेमांची जोरदार चर्चा आहे. पण या दोन्ही सिनेमांना टक्कर देणारा अभिनेता मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee) आगामी ‘जोरम’ (Joram Movie) हा सिनेमा 8 डिसेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा शूटिंग दरम्यान नेमकं काय झालं? कशा पद्धतीने आव्हानात्मक सामना करावा लागला, याबाबत अभिनेत्याने खुलासा केला आहे.
‘जोरम’ हा थरार नाट्य असणारा सिनेमा आहे. या सिनेमात मनोजने दसरू ही भूमिका साकारली आहे. नवजात लेकीचा जीव वाचवण्यासाठीचा संघर्ष करणाऱ्या वडिलांची एक अनोखी गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. देवाशीष मखीजा यांनी या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
मनोज वाजपेयी साकारत असलेलं ‘दसरू’ हे पात्र एका गावात राहणारं आहे. मात्र त्याच्या आयुष्यामध्ये असा काही ट्वीस्ट येतो की, त्याला ते गाव सोडावं लागतं. आपल्या तीन महिन्याच्या लेकीला वाचवण्यासाठी तो गाव सोडून मुंबई गाठतो. तर दुसरीकडे पोलीस आणि व्यवस्थेचाही त्याला सामना करावा लागतो.हे बघायला मिळणार आहे. दरम्यान शूटिंग दरम्यान देखील खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्याचे मनोज वाजपेयी यांनी खुलासा केला आहे.
‘जोरम’ या सिनेमाच्या शुटिंगबद्दल बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले, जोरम’ या सिनेमाचा भाग असल्याचा मला आनंद होत आहे. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे”. शूटिंग दरम्यान आम्हाला झारखंडमध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. ज्याची आम्हाला अपेक्षाही नव्हती. या गंभीर परिस्थितींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आम्हाला आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक होते. कलाकार आणि क्रू आणि स्थानिक प्रोडक्शन टीमचा खूप अभिमान आहे, ज्यांनी अविश्वसनीय प्रयत्न केले. त्यांनी एक आश्चर्यकारक काम केले आणि आम्ही कठीण परिस्थितीचा सामना करत असतानाही त्यांच्या कठोर परिश्रमाने आमचा प्रकल्प यशस्वी ठरली आहे.
पुढे म्हणाले की, “कोविडमुळे, आम्हाला गेल्या वर्षी मे पर्यंत आमचे शूटिंग पुढे ढकलावे लागले. देशातील सर्वात उष्ण राज्य असलेल्या झारखंडमध्ये वर्षातील सर्वात उष्ण महिना होता. लोहे ही खाण हे झारखंडमधील सर्वात उष्ण आणि धुळीने भरलेले, अत्यंत टोकाचे ठिकाण आहे. याठिकाणी तापमान 51-52 अंश होते. त्या कालावधीमध्ये देखील मनोज वाजपेयी आणि शूटिंग पूर्ण केल्याचे आव्हानात्मक प्रवास सांगितला आहे.
Rockstar DSP: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते रॉकस्टार डीएसपीसाठी 2024 ठरणार खास !
‘जोरम’ हा 8 डिसेंबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. देवाशिष मुखर्जी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. ‘जोरम’ सिनेमाचे आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवांमध्ये तोंडभरून कौतुक करण्यात आलं आहे. बुसान फिल्म फेस्टिव्हल, सिडनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, डर्बन फिल्म फेस्टिव्हल आणि एडिनबर्ग फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘जोरम’चा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता.