Rockstar DSP: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते रॉकस्टार डीएसपीसाठी 2024 ठरणार खास !

Rockstar DSP: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते रॉकस्टार डीएसपीसाठी 2024 ठरणार खास !

Rockstar DSP: येणार वर्ष रॉकस्टार डीएसपीसाठी (Rockstar DSP) नक्कीच खास असणार आहे. (National Film Award) कारण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते संगीतकार सध्या यशाचा अनोखा अनुभव घेत आहे. “पुष्पा” या ब्लॉकबस्टर (Pushpa Blockbuster) चित्रपटातील त्यांच्या अतुलनीय संगीत योगदानानंतर डीएसपीने भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘गो-टू उस्ताद’ म्हणून स्वतःची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RAAGA (@raaga.my)


‘पुष्पा’ मधील “श्रीवल्ली” आणि “ऊ अंतवा” सारख्या त्याच्या अलीकडील चार्ट-टॉपिंग हिट सोबत “हर घर तिरंगा” या गाण्याने संगीताचे पॉवरहाऊस म्हणून त्याने अनोखे स्थान मजबूत केले आहे. संगीतमय धून आणि पाय-टॅपिंग गाण्याची अनोखी पर्वणी तो सगळयांना देत असतो. रॉकस्टार डीएसपी त्याच्या आकर्षक ट्यून आणि फूट-टॅपिंग बीट्ससाठी कायम त्याला ओळखले जात असते. ही एक अनोखी शैली आहे जी पारंपारिक भारतीय संगीताला आधुनिक ध्वनींसोबत मिसळत असताना बघायला मिळत असते. पुष्पा: द रायझिंगचा साउंडट्रॅक प्रचंड यशस्वी झाला.

मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार अजय देवगण अन् तब्बूची जोडी, लवकरच प्रदर्शित होणार ‘औरों में कहाँ दम था’

2024 ची सुरुवात होताच संगीत प्रतिभावान रॉकस्टार DSP 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी लंडनमधील वेम्बली स्टेडियममध्ये त्याच्या पहिल्या UK टूरसह वर्षाची सुरुवात करणार आहे. यामध्ये त्याचे अभिनय आणि देशातील चाहत्यांना मोहित करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘थंडेल”, “कांगुवा” आणि “उस्ताद भगतसिंग” सारख्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये सध्या व्यस्त असून तो त्याच अष्टपैलुत्व दाखवत आहेत. डीएसपी 8 मार्च 2024 रोजी रिलीज होणार असलेल्या विकास बहल दिग्दर्शित अजय देवगण आणि आर. माधवन अभिनीत चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत आपले संगीतमय पाऊल ठेवणार आहे आणि यासाठी चाहते खूपच उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube