मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार अजय देवगण अन् तब्बूची जोडी, लवकरच प्रदर्शित होणार ‘औरों में कहाँ दम था’

मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार अजय देवगण अन् तब्बूची जोडी, लवकरच प्रदर्शित होणार ‘औरों में कहाँ दम था’

Auron Mein Kahan Dum Tha Release Date: अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बू (Tabu) ही जोडी बॉलिवूडच्या (Bollywood) ब्लॉक ब्लास्टर कलाकारांच्या यादीत आघाडीवर आहे. हे दोन्ही कलाकार अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. चाहत्यांना अजय आणि तब्बूची जोडी खूपचं आवडते. यावेळी त्याच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. दोघे पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या दोघांचा ‘औरों में कहाँ दम था’ (Auron Mein Kahan Dum Tha Movie) या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neeraj Pandey (@neerajpofficial)


अजय देवगण आणि तब्बू नीरज पांडेच्या (Neeraj Pandey) आगामी ‘औरों में कहाँ दम था’ या चित्रपटात पुन्हा त्यांची केमिस्ट्री बघायला मिळणार आहेत. चित्रपटाबाबत मोठे अपडेट्सही समोर आली आहे. नीरज पांडेने त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे, त्यानुसार अजय आणि तब्बूचा हा चित्रपट पुढीलवर्षी 26 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

याआधी अजय देवगणने या चित्रपटाची घोषणा केली होती. 5 डिसेंबर रोजी साइट X (ट्विटर) वर पोस्ट करत असताना त्याने लिहिले आहे की, “मी नीरज पांडेसोबत माझ्या सहकार्याची घोषणा करत आहे.” यानंतर चाहते चांगलेच उत्साहित उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Panchak Poster Released: आता कोणाचा नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा पोस्टर रिलीज

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे, मात्र चित्रपट थिएटरमध्ये किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त जिमी शेरगिल, सई मांजरेकर आणि शंतनू माहेश्वरी सारखे दिग्गज कलाकार ‘और में कहाँ दम था’ मध्ये बघायला मिळणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube