Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीने बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टमध्ये मुंबईकरांना दिली खास ट्रीट

Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीने बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टमध्ये मुंबईकरांना दिली खास ट्रीट

Rockstar DSP Created Musical Fireworks: राष्ट्रीय पुरस्कार विजेता रॉकस्टार डीएसपीने (Rockstar DSP) बॉलीवूड (Bollywood) म्युझिक प्रोजेक्ट (BMP) मध्ये तुफान स्टेज गाजवला आहे. मुंबईमध्ये (Mumbai) पार पडलेल्या या खास कार्यक्रमात त्याने त्याच्या संगीताने चाहत्यांना मोहित करून सोडलं आहे. अविस्मरणीय संगीत, ग्रूवी बीट्स आणि मनमोहक परफॉर्मन्सची ही रात्र खास झाली. यामुळे संगीत चाहते आणि रॉकस्टार डीएसपी चाहत्यांनी या कार्यक्रमाची एक अनोखी मज्जा अनुभवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Telegraph (@telegraphonline)


रॉकस्टार डीएसपी हा कायम त्याच्या अफलातून गाण्यासाठी ओळखला जातो. बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टमध्ये डीएसपीने त्याच्या संगीताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. चाहत्यांनी रॉकस्टार डीएसपीचे मंत्रमुग्ध करणारे आणि मनमोहक परफॉर्मन्सचे थेट पाहिले त्यांच्यासाठी ही पर्वणी होती. चाहत्यांनी त्याच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांच्या अविस्मरणीय संध्याकाळचा आनंद घेतला 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी लंडनमध्ये होणाऱ्या त्याच्या पहिल्या दौऱ्याबद्दल रॉकस्टार डीएसपी खूप उत्सुक झाले आहेत.

रॉकस्टार डीएसपीला नुकताच “पुष्पा: द राइज” या सिनेमातील उत्कृष्ट कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पाच नाही तर संगीत उद्योगातील त्याच्या उल्लेखनीय कामाचं कौतुक असल्याचे त्याने यावेळी सांगितलं आहे. डाउन-टू-अर्थ व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेल्या रॉकस्टार डीएसपीने त्याचा हा पुरस्कार चाहत्यांसह आणि पापाराझी सोबत साजरा केला.” पुष्पा: द राइज” साठी रॉकस्टार डीएसपीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याने चाहत्यांची आणि समीक्षकांची सारखीच प्रशंसा झाली आहे, आणि पापाराझींना त्याच्या या पुरस्काराचे कौतुक केलं आहे.

Milan Luthria: सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मिलन लुथरिया सह-दिग्दर्शनाच्या खुर्चीवर

दरम्यान व्यावसायिक कारकिर्दीत रॉकस्टार डीएसपीची एक नवीन प्रोजेक्ट येणार असून “पुष्पा 2: द रुल’, ‘कंगुवा’ आणि प्रतिभावान दिग्दर्शक विकासबहल दिग्दर्शित अजय देवगण आणि आर. माधवन अभिनीत अद्याप शीर्षक नसलेला सिनेमा यांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पांसाठी आतुरतेने अपेक्षित रिलीजची तारीख 8 मार्च 2024 ही सेट करण्यात आली आहे. चाहते DSP च्या आगामी संगीत उपक्रमांची आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे.

संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी नुकताचं पुष्पा: द रायझिंग या तेलगू चित्रपटातील त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube