राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट संगीत संयोजक विजेते Rockstar DSP ने मुंबईत केलं खास सेलिब्रेशन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट संगीत संयोजक विजेते Rockstar DSP ने मुंबईत केलं खास सेलिब्रेशन

Rockstar DSP Celebration in Mumbai: रॉकस्टार डीएसपीने (Rockstar DSP ) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award) सर्वोत्कृष्ट संगीतकार जिंकून आल्यावर मुंबईत केलं अनोखं सेलिब्रेशन केले आहे. रॉकस्टार डीएसपीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्याने चाहत्यांसह आणि पापाराझींसोबत यावेळी साजरा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by BollywoodNow (@bollywoodnow)


रॉकस्टार डीएसपीला नुकताच “पुष्पा: द राइज” या सिनेमातील उत्कृष्ट कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पाच नाही तर संगीत उद्योगातील त्याच्या उल्लेखनीय कामाचं कौतुक असल्याचे त्याने यावेळी सांगितलं आहे. डाउन-टू-अर्थ व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेल्या रॉकस्टार डीएसपीने त्याचा हा पुरस्कार चाहत्यांसह आणि पापाराझी सोबत साजरा केला.” पुष्पा: द राइज” साठी रॉकस्टार डीएसपीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याने चाहत्यांची आणि समीक्षकांची सारखीच प्रशंसा झाली आहे, आणि पापाराझींना त्याच्या या पुरस्काराचे कौतुक केलं आहे.

दरम्यान व्यावसायिक कारकिर्दीत रॉकस्टार डीएसपीची एक नवीन प्रोजेक्ट येणार असून “पुष्पा 2: द रुल’, ‘कंगुवा’ आणि प्रतिभावान दिग्दर्शक विकासबहल दिग्दर्शित अजय देवगण आणि आर. माधवन अभिनीत अद्याप शीर्षक नसलेला सिनेमा यांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पांसाठी आतुरतेने अपेक्षित रिलीजची तारीख 8 मार्च 2024 ही सेट करण्यात आली आहे. चाहते DSP च्या आगामी संगीत उपक्रमांची आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे.

Kangana Ranaut: कंगनाचं ठरलं! लवकरच बोहल्यावर चढणार, कोण असणार अभिनेत्रीचा पती?

संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी नुकताचं पुष्पा: द रायझिंग या तेलगू चित्रपटातील त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. समीक्षक आणि प्रेक्षकांनीही चित्रपटाच्या संगीताचे भरभरून कौतुक केले.अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका या त्रिकूटाने अभिनीत तो नवा प्रोजेक्ट करणार आहे. विशेषतः रॉकस्टार डीएसपी आणि अजय देवगण यांनी ‘दृश्यम 2’ मध्ये एकत्र काम केल्यानंतर आता नवीन काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube