Manoj Bajpayee: हिंदी सिनेमासृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हे सतत काही कारणांमुळे जोरदार चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी चाहत्यांच्या मनावर मोठी छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’(Gangs of Wasseypur) मधील सरदार खान अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. केवळ सिनेमाच (movie) नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) देखील मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची भुरळ पडली आहे.
‘राजनीति’ हा सिनेमा मिळण्याअगोदर मनोज बाजपेयी यांच्यासाठी काही वर्षं ही खडतर होती. त्यांना न शभणारे काही सिनेमा त्यांनी केवळ पैशांसाठी स्वीकारले जे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त फ्लॉप ठरले होते. यावरून त्यांनी बायको शबाना रजा हिने एकदा त्यांना चांगलेच खडसावले होते. केवळ पैशांसाठी वाईट सिनेमा स्वीकारू नका, अशी चांगलीच एकदा कानउघडणी केली होती. तिने एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे.
सिनेमाचे नाव न घेता मनोज यांनी ही आठवण सांगितली आहे. त्यांची बायको एक सिनेमा बघायला गेली असताना, काही चाहत्यांनी त्या सिनेमावर हसत होते. जेव्हा मनोज यांची बायको सिनेमा बघून घरी आली आणि त्यांनी तिला सिनेमाबद्दल विचारलं तर त्यावर शबाना मनोज यांना म्हणाली की, “पैशांसाठी सिनेमा करणं बंद कर, आपल्यावर एवढी वेळ अद्याप आली नाही. तो सिनेमा फारच वाईट होता, मला लाज वाटत होती, हे फारच अपमानजनक होतं. पुन्हा कृपया असा सिनेमा करू नको. कथा आणि पात्र निवडण्यात तू माहिर आहेस आणि तेच तू करावं. तुला स्वतःला वेगळं सिद्ध करून दाखवायची काही गरज नाही.”
मनोज बाजपेयी आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’दरम्यान देखील मनोज यांना बायकोचा असाच अनुभव आला आहे. या सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या दरम्यान होत असलेला गोंधळ बघून मनोज यांच्या बायकोला हसू आवरत नव्हतं. नुकतंच एका मुलाखतीच्या दरम्यान मनोज यांनी या सगळ्या गोष्टींचा मोठा खुलासा केला आहे. मनोज बाजपेयी यांचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा सिनेमा नुकताच ओटीटीवर आला असून चाहत्यांनी मनोज यांच्या कामाची प्रचंड प्रशंसा केली आहे.
यामध्ये ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या सिनेमाच्या सुरुवातीला एका अल्पवयीन मुलगी आणि तिचे पालक दिल्लीतील कमल नगर पोलीस ठाण्यात जात असल्याचे दिसत आहे. पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर ते एका बाबावर अल्पवयीन शोषणाचा गुन्हा दाखल करतात. गुन्ह्याची नोंद झाल्यावर पोलीस त्या बाबाला अटक करतात. दरम्यान बाबांचे भक्त अटक केल्याने संतापतात. वकील पैसे घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान मुलीचे आई-वडील पीसी सोळंकी यांची मदत घेतात. त्यामुळे पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा सिनेमा पाहावा लागणार आहे.
https://letsupp.com/entertainment/movie-review-manoj-bajpayee-sirf-ek-banda-kafi-hai-movie-review-50640.html
अभिनेता मनोज वाजपेयीने ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या सिनेमात खूपच धमाल काम केले आहे. राजस्थानच्या भाषेवर त्याचे उत्तम प्रभुत्व मिळवलं आहे. या सिनेमासाठी त्याने घेतलेली मेहनत हे सिनेमा पाहताना दिसून येणार आहे. एकंदरीत मनोजने पीसी सोलंकीची गोष्ट खऱ्या अर्थाने जिवंत केल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुलीची भूमिका अदिती सिंह एंड्रिजाने साकारली आहे. तिचे देखील काम उत्तम प्रकारे असल्याचे दिसून येत आहे. विपिन शर्माचा अभिनय जबरदस्त आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी आपले पात्र योग्यपद्धतीने साकारले असल्याचे दिसून आले आहे.
‘सिर्फ एक बंदा काफी है’ या सिनेमात प्रेक्षक शेवटपर्यंत गुंतत गेल्याचे दिसून येत आहे. हा एक सर्वात उत्तम कोर्ट ड्रामा असल्याचे दिसून आले आहे. जर तुम्ही सत्याच्या पाठीशी असाल तर तुमचे कोणतेही नुकसान होऊ शकत नाही, ही या सिनेमाची गोष्ट आहे. या सिनेमाला एक गती आहे. या सिनेमातील संवाद, दृश्ये अत्यंत प्रभावी आहेत. अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित या सिनेमात एक महत्त्वाचा विषय अतीशय सोप्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. यामुळे दिग्दर्शकांचं विशेष कौतुक. अशापद्धतीच्या कथेची निर्मिती केल्याबद्दल या सिनेमाचे निर्माते विनोद भानुशाली यांचेही कौतुक होत आहे.