Sangharsh Yoddha : मनोज जरांगे यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर! दोन दिवसांत केली ‘तब्बल’ इतकी कमाई

Box Office Collection Day 2: मनोज जरांगे यांच्यावर आधारित 'संघर्षयोद्धा' हा मराठी सिनेमा सध्या सिनेमागृहांमध्ये जोरदार धुमाकूळ घालत आहे.

Sangharsh Yoddha : मनोज जरांगे यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर! दोन दिवसांत केली 'तब्बल' इतकी कमाई

Sangharsh Yoddha : मनोज जरांगे यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर! दोन दिवसांत केली 'तब्बल' इतकी कमाई

Sangharsh Yoddha Box Office Collection Day 2: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ (Sangharsh Yoddha )हा मराठी सिनेमा सध्या सिनेमागृहांमध्ये जोरदार धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात अभिनेता रोहन पाटील हा मनोज जरांगे यांच्या मुख्य भूमिकेत दिसत आहे. दरम्यान 14 जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.मात्र या दोन दिवसांत काही लाखांचा गल्ला हा मराठी सिनेमा जमवला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर (Box Office) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे की नाही? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.


सुरुवातीला हा सिनेमा 21 जून दिवशी प्रदर्शित होणार होता, पण नंतर त्याची प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती आणि हा सिनेमा 14 जून रोजी रिलीज करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर हा सिनेमा आधारित आहे. तसेच या सिनेमामध्ये अॅड.गुणरत्न सदावर्ते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

सिनेमाची कमाई किती?

अगोदरपासूनच या सिनेमाची चांगलीच जोरदार चर्चा रंगत होती. पण या सिनेमाची कमाई मात्र तितकी झाली नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सॅनसिल्कच्या अहवालानुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी 9 लाखांच्या जवळपास कमाई केली. दुसऱ्या दिवशी 8 ते 9 लाखांच्या आसपास होती. त्यामुळे सिनेमाची एकूण कमाई 20 लाखांच्या आसपास गेल्याचं दिसत आहे.

Sangharshayoddha: मोहन जोशी साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका

मनोज जरांगेंच्या भूमिकेत रोहन पाटील

या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही मुख्य भूमिकेत आहेत.

Exit mobile version