Manoj Jarange यांचे उपोषण अखेर स्थगित! सरकारला महिन्याभराच्या अल्टिमेटमसह राजकारणात उतरण्याचा इशारा

Manoj Jarange यांचे उपोषण अखेर स्थगित! सरकारला महिन्याभराच्या अल्टिमेटमसह राजकारणात उतरण्याचा इशारा

Manoj Jarange strike adjourned by giving Ultimetam to Government Otherwise enter politics : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आज मंत्री शंभूराज देसाई आणि शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भूमरे यांनी जरांगे यांची भेट घेतली.

बियाणं, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

या भेटीमध्ये देसाई आणि भूमरे यांच्या या शिष्टाचाराला यश आले आहे. त्यांच्या अश्वासनामुळे जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मात्र यावेळी जरांगेंनी सरकारला महिनाभराची मुदत दिली. तसेच त्यानंतरही आरक्षण न मिळाल्यास आपण थेट राजकारणात उतरणार असल्याचं त्यांनी इशारा दिला आहे.

E-Shram Card : असंघटीत कामगारांसाठीच्या योजनेचा कोणाला अन् कसा फायदा होणार?

यावेळी शंभूराज देसाई यांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जरांगेंच्या आधीच्या सर्व मागण्यांवर जोमानं काम सुरू आहे. तसेच आचारसंहितेमुळे हे काम खंडित झाल होतं असे त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे जरांगे यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही. असं मानू नये मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देखील देण्यात आलं आहे. सगे सोयऱ्यांच्या बाबतीतही विचार होईल. हवं तर यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावू. असं आश्वासन यावेळी देसाई यांनी दिला तसेच जरांगे यांच्या सर्व मागण्या देसाई यांनी लिहून घेतल्या.

Auron Mei Kaha Dum Tha: अजय आणि तब्बूची रोमॅंटिक केमिस्ट्री! ‘औरों में कहा दम था’चा ट्रेलर रिलीज

यावर जरांगे म्हणाले की, शंभूराजे देसाई तुम्ही यायलाच नको होतं. तर या मागण्यांमध्ये जरांगे यांनी मराठी तरुणवारांवर आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या सर्व केसेस मागे घ्या. सगे सोयऱ्यांची मागणी तातडीने पूर्ण करा. शिंदे समितीचे काम चालू ठेवा. या मागण्या पुन्हा केल्या. त्यावर देसाई म्हणाले की काही गुन्हे मागे घेतले. मात्र गंभीर गुन्हे मागे घेता येणार नाहीत. तसेच मी उद्याच बैठक लावतो. असही देसाई म्हणाले.

त्यावर जरांगे यांनी सरकारला 30 जूनच्या आत आरक्षणाच्या सगळ्या गोष्टी मार्गी लावण्यासाठी मुदत दिली. अन्यथा आपण थेट राजकारणात उतरू असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला. मात्र देसाई आणि भुमरे यांच्या शिष्टाचाराला यश आलं आणि आज अखेर जरांगे यांनी त्यांचे उपोषण स्थगित केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube